शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

हवेत लटकणारी चहाची टपरी पाहिलीय का? ग्राहकांनाही करावी लागते 'दोरीवरची कसरत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 13:15 IST

जमीनीपासून तब्बल 393 फूट उंचीवर आहे ही टपरी

Tea Stall at Mountain: चहाची तल्लफ आली की मित्रमंडळी चहाच्या टपरीवर 'कटिंग' प्यायला जातात. ऑफिसच्या बाहेर सामान्यत: हे चित्र पाहायला मिळतं. पण जर एखाद्याला चहा पिण्यासाठी दोरखंडाच्या सहाय्याने डोंगरावर चढून जावं लागलं तर.... सध्या एक दुकान त्याच्या अनोख्या लोकेशनमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तुम्ही विचार करत असाल की या टपरीमध्ये विशेष काय आहे? ही टपरी एका खडकाच्या काठावर 393 फूट उंचीवर आहे. चहा पिण्यासाठी इथे लोक दोरीवर चढून इथे जातात आणि मग या साहसाचा आनंद घेतात. चीनच्या हुनान प्रांतातील झिन्युझाई नॅशनल जिओलॉजिकल पार्कमध्ये डोंगराच्या बाजूला ही टपरी आहे.

गिर्यारोहकांसाठी मिळते सुविधा

इनसाइडर डॉट कॉमच्या वृत्तानुसार, ज्या गिर्यारोहकांना गिर्यारोहणाच्या दरम्यान विश्रांतीची आवश्यकता असते त्यांना या टपरीवर अल्पोपहार विकला जातो. ट्विटरवर @gunsnrosesgirl3 या हँडलसह या स्टोअरचे छायाचित्र देखील अलीकडेच शेअर करण्यात आले आहे. फोटो शेअर झाल्यापासून त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक लहान लाकडी पेटी लटकलेली असल्याचे फोटोत दिसते. एका कड्याच्या टोकाला लटकलेल्या या छोट्याशा दुकानाचा फोटो पाहा-

पोस्ट पाहून लोक थक्क झाले...

ही पोस्ट काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून या पोस्टची चर्चा आहे. या शेअरला १.२ मिलियन व्ह्यूज मिळाले असून ८ हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. या स्टोअरवर आपल्या प्रतिक्रिया शेअर करण्यासाठी अनेकांनी पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडले आहे. काहींनी लिहिले आहे की, हा निव्वळ वेडेपणा आहे. तर काहींचे असेही म्हणणे आहे की, यामागील कल्पना अविश्वसनीय व आश्चर्यकारक आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरल