शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! पक्षाचं घरटं वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी तब्बल ३५ दिवस रस्त्यावरील लाईट्स ठेवले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 16:32 IST

झाडांवर घरटं बांधण्याव्यतिरिक्त एखाद्या घराच्या खिडकीजवळ, कोपरा गाठून पक्षी आपलं घरटं बांधतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक गमतीदार किस्सा सांगणार आहोत.

माणसं आणि मुक्या जनावरांचे नातं हे अनोखे आहे. या नात्यातून खूप काही शिकायला मिळतं. लहान लहान काड्या, कचरा आपल्या चोचीत मावेल आणि जे मिळेल ते साहित्य घेऊन पक्षी आपलं सुंदर असं घरटं तयार करतात. झाडांवर घरटं बांधण्याव्यतिरिक्त एखाद्या घराच्या खिडकीजवळ, कोपरा गाठून पक्षी आपलं घरटं बांधतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक गमतीदार किस्सा सांगणार आहोत.

एका पक्ष्याने रस्त्यावरील  लाईट्सच्या स्वीचबोर्डच्या आत आपलं घरटं तयार केलं त्यानंतर अंडी सुद्धा दिली आहेत. गावातील लोकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रस्त्यावरील लाईट लावणंच सोडून दिलं. तुमचा विश्वास बसणार नाही पण जवळपास ३५ दिवस या गावातील लोकांनी रस्त्यावरील लाईट्स बंद ठेवले होते.  ही घटना परदेशात नाही तर भारतातच घडली आहे. 

तामिळनाडूमधील शिवगंगा भागात एक गाव आहे. या गावकऱ्यांना  काही  दिवसांपूर्वी कळले की रस्त्यावरील लाईट्सच्या स्वीचबोर्डच्या आत पक्ष्याने एक घरटं तयार केलं होतं. या घरट्यात ३ निळ्या आणि हिरव्या रंगाची अंडी होती. गावातील काही सदस्यांनी मिळून  या पक्ष्याच्य घरट्याचा फोटो गावातील इतर लोकांना व्हाट्सअॅपच्या माध्यमातून पाठवला. त्यावेळी गावातील सगळया लोकांनी मिळून ठरवलं की जोपर्यंत पक्षी घरट्यातून सुखरूप बाहेर येणार नाहीत. तोपर्यंत स्वीचबोर्डचा वापर केला जाणार नाही. त्यामुळेच  ३५ दिवस या गावातील रस्त्यावरील लाईट्स बंद ठेवाव्या लागल्या.

त्यानंतर पंचायत अध्यक्ष एच कालीश्वरी सुद्धा यात सहभागी झाल्या. दरम्यान  गावातील काही लोकांनी या गोष्टीसाठी विरोधही केला. त्यानंतर गावतील इतर लोकांनी समजावल्यानंतर सगळेजण लाईट्स बंद ठेवण्यासाठी तयार झाले. गावात बैठक घेण्यात आली त्यातून लाईट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.  पक्ष्याची अंडी आणि घरटी वाचवण्यासाठी संपूर्ण गाव तब्बल ३५ दिवस अंधारात राहिल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. 

व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण

भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके