शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: या लग्नाचा न्याराच थाट; स्कूबा डायव्हिंग करत समुद्रात ६० फूट खोल बांधली लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 12:29 IST

पाण्याखाली संपन्न झाला विवाह सोहळा; भन्नाट लग्नाची सर्वत्र चर्चा

चेन्नई: आपलं लग्न अविस्मरणीय व्हावं, असं सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळे लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तमिळनाडूत राहणाऱ्या व्ही. चिन्नादुराई आणि एस. श्वेता यांनादेखील असंच वाटायचं. त्यामुळेच त्यांनी लग्न करण्यासाठी एक भन्नाट प्लान केला. त्यांच्या या हटके लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या लग्नाचा व्हिडीओ अगदी भन्नाट आहे.चार वर्षांच्या चिमुरडीनं शोधला नामशेष झालेल्या डायनासोरच्या पायाचा ठसाचिन्नादुराई आणि श्वेता यांनी तमिळनाडूतल्या नीलकंरई येथील समुद्रात १ फेब्रुवारीला लग्न केलं. दोघेही अगदी व्यवस्थित तयार होऊन, नटूनथटून समुद्र किनारी आले होते. मुहूर्त जवळ येताच दोघांनी समुद्रात उडी घेतली. पाण्यात ६० फूट खाली गेले. दोघांनी एकमेकांना हार घातले. चिन्नादुराई आणि श्वेता पेशानं सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेत. चिन्नादुरई प्रोफेशनल स्कूबा डायव्हर आहेत. तर श्वेता गेल्या काही महिन्यांपासून स्कूबा डायव्हिंग शिकत आहेत. लग्नाच्या वेळी दोघांनी पारंपारिक पोशाख परिधान केले होते.आधी नकार, मग होकारश्वेता कोईमंतूरच्या रहिवासी आहेत. स्कुबा डायव्हिंग करून लग्न बंधनात अडकण्याची संकल्पना चिन्नादुराई यांची होती. सुरुवातीला श्वेता यांना ही कल्पना फारशी आवडली नाही. त्या घाबरल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारे लग्न करण्यास त्यांचा नकार होता. मात्र चिन्नादुराई यांनी त्यांची समजूत काढली. यानंतर त्या तयार झाल्या. तिरुवन्नमलईमध्ये राहणाऱ्या चिन्नादुराई यांना लहानपणापासूनच जलतरणाची आवड आहे. ते १२ वर्षांपासून स्कुबा डायव्हिंग करत आहेत. बापरे! मासेमारी करणं चांगलंच अंगाशी आलं, डॉक्टरांनी घश्यातून काढला ७ इंचाचा मासा, पाहा व्हिडीओ४५ मिनिटांत विवाह संपन्नचिन्नादुराई आणि श्वेता यांचा विवाह सोहळा ४५ मिनिटांत संपन्न झाला. चिन्नादुराई यांनी पाण्याखाली श्वेता यांना पुष्पगुच्छ देऊन प्रपोज केलं. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. समुद्राला साक्षी ठेवून एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं. यानंतर दोघांनी सात फेरेदेखील घेतले.

टॅग्स :marriageलग्न