शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सलाम! घरची परिस्थिती बिकट, पण मनाची श्रीमंती मोठी; मुस्लिम विधवा राबतात गोरगरीबांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 15:23 IST

विधवा महिला स्वतः जेवण तयार करून गरीबांना वाटप करत  आहेत. 

सध्या कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सोडता लोकांना बाहेर पडता येत नाही. अशा परिस्थितीत हातावर पोट असलेल्या लोकांचे अनेक कामगारांचे हाल होत आहेत. त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. अशात समाजातील काही लोक मदतीचा हात पुढे करत आहेत. यात फक्त पुरूषच नाही तर महिलांचा सुद्धा समावेश आहे.

सध्या पवित्र रमजानचा महिना सुरू असल्यामुळे जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी मदत करायला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी एका शेतमजूराने हज ला जाण्यासाठी जमा केलेल्या पैश्यातून गरीबांना अन्नाचे वाटप केले. अशीच एक घटना  सिरियामधूनसुद्धा समोर येत आहे. या ठिकाणी विधवा महिला स्वतः जेवण तयार करून गरीबांना वाटप करत  आहेत. 

न्यूज एजंसी एएफपीने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.  या व्हिडीओत या वुमन किचन डायरेक्टरच्या प्रमुख या सांगतात की,  जेवण बनवत असलेल्या महिला या विधवा असून त्यांचा मुळ उद्देश रमजानच्या महिन्यात गोरगरीबापर्यंत अन्न पोहोचवण्याचा आहे.  

या महिला जेवण तयार करून गोरगरीबांना आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महिला मास्क आणि ग्लोव्हज घालून जेवण बनवत आहेत. (हे पण वाचा-जुळ्या मुलांची राजधानी असलेल्या 'या' प्रदेशाबद्दल माहीत आहे का?)

जेवण तयार झाल्यानंतर कारमध्ये ठेवून वेगवेगळया भागात पाठवलं जातं. याशिवाय या महिलांचे जेवण तयार करून झाल्यानंतर काही वॉलेंटिअर्स जेवणाचं वाटप करण्यासाठी मदत करतात.  माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून सिरियात युध्दजन्य परिस्थिती आहे.

यूएनएच्यामते सिरियातील ८० टक्के जनता ही गरीबीच्या, दारिद्र्याच्या परिस्थितीचा सामना करत आहे. गरजू लोकांना अन्नदानाचं काम करत असेलेल्या या विधवा महिलांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. (हे पण वाचा- ५ मीटर कापडाने केली सुरुवात, मास्क शिवणाऱ्या आजीबाईला शेजाऱ्यांकडून मदतीचा हात)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJara hatkeजरा हटके