शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य! 'या' गावातील प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख आहे 1 जानेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 14:39 IST

हरिद्वारपासून २० किलोमीटरवरील खाटा गावात एक अजब प्रकार पाहायला मिळतो आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी रोजी झाल्याचं चित्र समोर आलं आहे.

ठळक मुद्दे हरिद्वारपासून २० किलोमीटरवरील खाटा गावात एक अजब प्रकार पाहायला मिळतो आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी रोजी झाल्याचं चित्र समोर आलं आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख जन्मतारीख १ जानेवारी असू प्रत्येक व्यक्तीच्या आधारकार्डावर 1 जानेवारी ही जन्मतारीख आहे. 

देरहराडून- हरिद्वारपासून २० किलोमीटरवरील खाटा गावात एक अजब प्रकार पाहायला मिळतो आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी रोजी झाल्याचं चित्र समोर आलं आहे. त्या गावातील प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख जन्मतारीख १ जानेवारी असून प्रत्येकाच्या आधारकार्डावर 1 जानेवारी ही जन्मतारीख आहे. 

आधार कार्डावर असलेल्या माहितीनुसार, खाटा गावातील मोहम्मद खानची जन्मतारीख १ जानेवारी आहे. त्यांचे शेजारी अलफदीन यांचाही जन्म १ तारखेचाच आहे. त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा जन्म १ जानेवारी आहे. ही परिस्थिती फक्त एकाच कुटुंबाची आहे. इतर कुटुंबामध्येही सारखंच चित्र पाहायला मिळतं आहे. पण या गावातील ८०० कुटुंबांतील प्रत्येक सदस्याच्या जन्म आधार कार्डावरील नोंदीनुसार १ जानेवारीलाच झालेला आहे. ग्रामस्थांनी आधार्ड कार्ड तयार करताना आपली ओळखपत्रं आणि मतदान ओळखपत्र सादर केले होते. तरीही आधार्ड कार्ड नोंदणी करणाऱ्या एजन्सीनं हा गोंधळ केल्याची चर्चा आहे.

आम्हाला विशेष ओळखपत्र क्रमांक दिला जाईल, असं सांगितलं होतं. पण यात विशेष काय आहे? सगळ्यांची जन्मतारीख एकच छापली आहे, असं अलफदीन यांनी म्हंटलं आहे.

जन्मतारीखेशिवाय जन्मवर्षही मतदान आणि रेशन कार्डावरील तारखेपेक्षा वेगळी छापून आली आहे. तेथील काही वृद्धांचं वय 22 वर्ष तर काही मुलांचं वय 15 ते 60 वर्षांपर्यंत छापून आलं आहे, असं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. ग्रामस्थांनी रेशन कार्ड आणि मतदान ओळखपत्रांच्या कॉपी एजन्सीकडे दिल्या होत्या. ही चूक संबंधित एजन्सीची आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वीच आधार कार्ड तयार करण्यासाठी माहिती जमा केली होती. या गोंधळामुळे आता सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहू, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. उपसरपंच मोहम्मद इम्रान यांनी हे मत व्यक्त केलं आहे. 

आधार कार्डातील गोंधळाचा हा पहिलाच प्रकार नाही. याआधी ऑगस्टमध्ये आग्रा जिल्ह्यातील तीन गावे आणि अलाहाबादमधील एका गावातही सर्व ग्रामस्थांची जन्मतारीख १ जानेवारी छापण्यात आली होती.

दरम्यान, युआयडीएआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून कुठलीही चूक झाली नसल्याचं म्हंटलं आहे. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड