शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य! कार चालविताना हेल्मेट घातलं नाही म्हणून आकारला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 13:24 IST

सीटबेल्ट न लावता कार चालविली म्हणून अनेकदा दंड आकारल्याचं पाहायला मिळतं.

ठळक मुद्दे सीटबेल्ट न लावता कार चालविली म्हणून अनेकदा दंड आकारल्याचं पाहायला मिळतं. हेल्मेट न घालता भरतपूरमध्ये  कार चालवत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

जयपूर- सीटबेल्ट न लावता कार चालविली म्हणून अनेकदा दंड आकारल्याचं पाहायला मिळतं. पण आता हेल्मेट न घालता भरतपूरमध्ये  कार चालवत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. भरतपूरमध्ये एका 23 वर्षीय तरूणाला कार चालविताना हेल्मेट न घातल्याने ट्रॅफिक पोलिसांनी 200 रूपये दंड आकारला आहे. याचाच निषेध करण्यासाठी ही व्यक्ती आता कार चालविताना हेल्मेटचा वापर करते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

भरतपूरमधील सेवार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खरेरा गावात राहणाऱ्या विष्णू शर्मा या तरूणाने कार चालविताना हेल्मेट वापरलं नाही म्हणून दंड भरला. 1 डिसेंबर रोजी आगराहून मूळ गावी परतत असताना हा प्रकार घडला. रस्त्यात ट्रॅफिक पोलिसांनी त्याला थांबवून दंड भरायला लावला. गाडी चालविताना हेल्मेट वापरलं नाही, असं पोलिसाने चलनमध्ये नमूद केलं. या घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून विष्णू शर्मा या तरूणाने त्याच्याकडील व्हॅन चालविताना हेल्मेट वापरायला सुरूवात केली.

गावाला परत जात असताना मी गाडी चालवत होतो, तेव्हा माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स पेपर, गाडीचं रजिस्ट्रेशन सगळ्या गोष्टी होत्या. सीट बेल्टही घातलं होतं. पण तरीही मला दंड आकारण्यात आला. पोलिसांनी माझ्याकडून 200 रूपये दंड घेऊन चलन माझ्या हातात दिलं. त्यामध्ये हेल्मेट वापरलं नाही, असं कारण होतं. याचा निषेध करण्यासाठी मी दररोज व्हॅन चालविताना हेल्मेट वापरायला सुरूवात केली, असं विष्णू शर्मा यांने म्हंटलं आहे. पोलिसांबरोबर काही वाद झाला का? असंही विष्णूला विचारण्यात आलं पण पोलिसांशी काहीही वाद झाला नसून असा विचित्र दंड आकारला म्हणून मलाही आश्चर्य वाटल्याचं विष्णूने म्हंटलं. 

विष्णूने सीट बेल्ट वापरला नव्हता म्हणून त्याला दंड आकारण्यात आला पण चलनमध्ये चुकीने हेल्मेट न वापरल्याचं कारण लिहिण्यात आलं, असं स्पष्टीकरण विष्णूला दंड आकारलेल्या ट्रॅफिक पोलिसाने दिलं आहे. 

टॅग्स :carकारtraffic policeवाहतूक पोलीस