शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

या ठिपक्यांमधील आणि झेब्रा प्रिंटमधील अक्षरं तुम्हाला ओळखता येतायत का? ९० टक्के झाले फेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 19:05 IST

समोर दिसणारी गोष्ट आपण कोणत्या बाजूने किंवा कोणत्या दृष्टीकोनातून पाहत आहोत, यानुसार त्यांचा अर्थ बदलत जातो. आज आपण अशाच प्रकारचे काही ऑप्टिकल इल्युजन (Trending Optical Illusions) पाहणार आहोत.

कोडी सोडवायला कोणाला आवडत नाही? कोडी सोडवताना केवळ आपला चांगला टाईमपास नाही होत, तर आपल्या बुद्धीलाही बरीच चालना (Riddles Help Sharpen Mind) मिळते. तुम्ही ऑप्लिकल इल्युजन (Optical Illusions) प्रकारची कोडी आतापर्यंत पाहिली असतीलच. यांमध्ये समोर दिसणारी गोष्ट आपण कोणत्या बाजूने किंवा कोणत्या दृष्टीकोनातून पाहत आहोत, यानुसार त्यांचा अर्थ बदलत जातो. आज आपण अशाच प्रकारचे काही ऑप्टिकल इल्युजन (Trending Optical Illusions) पाहणार आहोत.

या फोटोकडे तुम्ही पाहिलं, तर सुरूवातीला तुम्हाला लाल रंगाच्या अनेक पट्ट्या दिसतील. मात्र, जरा नीट लक्ष दिलं तर या पट्ट्यांमध्येच MORE ही अक्षरं दडलेली (Optical Illusion Answers) दिसून येतील. जर तुम्हाला ही अक्षरं शोधणं अवघड वाटत असेल, तर पुढचे काही फोटो नक्कीच पाहा.

या फोटोमध्ये पिवळ्या रंगाच्या बॅकग्राउंडवर भरपूर हिरवे ठिपके दिसून येतील. या ऑप्टिकल इल्युजनमध्ये नीट पाहिल्यास तुम्हाला MILE ही अक्षरं दिसतील. विशेष म्हणजे, हे सर्व ठिपके एका ठिकाणी स्थिर असूनही, तुम्हाला ते हलताना दिसतील. त्यामुळे या फोटोमध्ये दडलेली अक्षरं शोधणं थोडं अवघडच आहे.

हे ऑप्टिकल इल्युजनही आधीसारखंच आहे. मात्र यामध्ये हिरवे नाही, तर निळे ठिपके आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे, हे ठिपके थोडे मोठे आहेत. शिवाय या ठिपक्यांचा पॅटर्नदेखील तुम्हाला मध्ये-मध्ये तुटलेला वाटेल. या तुटलेल्या पॅटर्नमध्येच या कोड्याचं उत्तर दडलंय. तुम्ही नीट पाहिलं तर यामध्ये तुम्हाला NEAR ही अक्षरं दडलेली दिसतील.

या आधीच्या सर्व इल्युजन्सच्या तुलनेत हे कदाचित सगळ्यात सोपं असावं. यामध्ये झेब्र्याच्या अंगावर असतात त्याप्रमाणे काळ्या-पांढऱ्या पट्ट्या दिसून येतील. नीट पाहिलं तर या पट्ट्यांमध्ये DOG ही अक्षरं दडलेली तुम्ही पाहू शकाल. या फोटोमध्ये असलेल्या डिझाईनचा फिक्स असा पॅटर्न नाहीये. त्यामुळे यातील अक्षरं ओळखणं सगळ्यात अवघड आहे. थोडं नीट पाहिलं तर फोटोच्या मध्ये तुम्हाला WALK ही अक्षरं दिसतील.

या सगळ्या ऑप्टिकल इल्युजन्समध्ये एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे सर्वांची उत्तरं, म्हणजेच सर्व फोटोंमध्ये दडलेले शब्द हे फोटोच्या मध्यभागी आहेत. ही इल्युजन्स सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल (Viral optical illusions) होत आहेत. बहुतांश लोकांना ही सोडवल्याचं समाधान मिळत आहे. कित्येकांनी कमेंट्समध्ये याची उत्तरंही दिली आहेत.

तुमच्यासाठी हे शेवटचं आणि सर्वांत अवघड असं ऑप्टिकल इल्युजन. 99 टक्के लोकांना याचं उत्तर सोडवता आलं नाहीये, हे विशेष. या इल्युजनमध्ये BAD EYES हे शब्द दडले आहेत. तुम्हीही पहा, तुम्हाला हे शब्द सापडतात का?

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल