शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 19:52 IST

Jara Hatke News: उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील गांधीनगर परिसतार असलेला एक ज्वेलरी शॉप सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या ज्वेलरी शॉपची रखवाली चक्क एक गावठी कुत्रा करत असल्याने हा शॉप चर्चेचा विषय ठरला आहे.

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील गांधीनगर परिसतार असलेला एक ज्वेलरी शॉप सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या ज्वेलरी शॉपची रखवाली चक्क एक गावठी कुत्रा करत असल्याने हा शॉप चर्चेचा विषय ठरला आहे. राधाकृष्ण ज्वेलर्स नावाच्या या दुकानाचे मालक कृपाशंकर जयस्वाल यांनी त्यांच्या दुकानाच्या संरक्षणाची जबाबदारी सुरक्षा रक्षकांऐवजी आपल्या देशी कुत्र्याकडे सोपवली आहे. या कुत्र्याचं नाव टायसन असं असून, हा कुत्रा केवळ दुकानाची राखवालीच करत नाही तर गळ्यात तब्बल ५० तोळ्यांची माळा घालून फिरतो. अत्यंत महागडी सोन्याची चेन घालून फिरणाऱ्या या कुत्र्याला पाहण्यासाठी दूर दूर वरून लोक येतात. तसेच आता या कुत्र्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

दुकानदाराने सांगितले की, टायसन हा दुकानाच्या आतबाहेर दोन्हीकडे सुरक्षेची जबाबदारी तो सांभाळतो. जेव्हा कुणी ग्राहक येतो तेव्हा केवळ वास घेऊन त्याची ओळख पटवतो. एवढंच नाही तर दुकानाच्या आजूबाजूला फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवून असतो. टायसन याचं ही स्टाईल लोकांना खूप आवडत आहे.

या कुत्र्याबाबत लोकांनी सांगितलं की, हल्ली दुकानांच्या संरक्षणासाठी गार्ड आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावावे लागतात. तिथे कृपाशंकर जयसवाल यांनी देशी कुत्र्यालाचा सुरक्षा रक्षक बनवून एक वेगळंच उदाहरण समोर ठेवलं आहे. टायसनच्या गळ्यात ५० तोळ्यांची चेन असल्याचा दावा सोशल मीडियावरून केला जात आहे. मात्र सोन्याच्या चेनबाबत विचारलं असता दुकानदाराने त्याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Local Dog Becomes Jewelry Shop Guardian, Wears Gold Chain!

Web Summary : A local dog named Tyson guards a jewelry shop in Uttar Pradesh. He wears a gold chain and identifies customers by smell. His unique style is gaining popularity, showcasing an alternative to guards and CCTV.
टॅग्स :dogकुत्राJara hatkeजरा हटके