शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

रोमचा सर्वात कुप्रसिद्ध सम्राट ज्याने तावातावात मित्रांसमोर पत्नीला नग्न करुन फिरवलं होतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 1:43 PM

इतिहासातील अनेक राजे त्यांच्या हुकुमशाहीसाठी कुप्रसिद्ध होते. अशाच राजांमध्ये एक राजा होता रोमचा तिसरा सम्राट गायस ज्यूलिअस सीझर जर्मेनिकस.

(Image Credit : historycollection.co)

आतापर्यंत आपण इतिहासातील अनेक राजांच्या कथा ऐकल्या-पाहिल्या असतील. यातील काही राजे आपल्यासाठी प्रेरणादायी होते तर काहींच्या कथा ऐकून अंगावर शहारे येतात. इतिहासातील अनेक राजे त्यांच्या हुकुमशाहीसाठी कुप्रसिद्ध होते. अशाच राजांमध्ये एक राजा होता रोमचा तिसरा सम्राट गायस ज्यूलिअस सीझर जर्मेनिकस. रोमच्या या राजाच्या वेगळ्या प्रयोगांचं जेवढं कौतुक केलं जायचं, तेवढंच त्याच्या वाईट गोष्टींबाबतही बोबलं जायचं. चला जाणून घेऊ २ हजार वर्षांपूर्वी कसा होता गायस ज्यूलिअस सीझर जर्मेनिकस.

१) बकरीचं नाव ऐकताच देत होता फाशी

(Image Credit : Iconic Greats)

गायस ज्यूलिअस सीझर जर्मेनिकस हा दिसायला उंच आणि सडपातळ होता. तसेच त्याचे डोळे आतल्या बाजूस अधिक होते. शारीरिक रूपाने मजबूत नसल्याने त्याची खिल्ली उडवली जात होती. इतकेच नाही तर त्यांच्या डोळ्यांमुळे लोक त्याची तुलना अनेकदा बकरीसोबत करत होते. त्यामुळे जेव्हा कधी त्याच्यासमोर बकरीचा उल्लेख करत असे, राजा त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देत होता.

२) लांब केस असलेल्या लोकांना शिक्षा

जर्मेनिकसला लांब केसांची चीड होती. त्यामुळे त्याच्या साम्राज्यात कुणी जर लांब केस ठेवताना कुणी दिसलं तर, तो त्या व्यक्तीला लगेच टक्कल करण्याचा आदेश देत होता. 

३) घोड्याला केलं होतं मंत्री 

(Image Credit : HistoryCollection.)

रोमच्या या सम्राटाला घोड्यांची फार आवड होती. तो त्याच्या इनसिटॅटस या घोड्याच्या फार जवळ होता. इतकेच नाही तर असेही म्हटले जाते की, इनसिटॅटससाठी त्याने एक सुंदर घरही तयार करून घेतलं होतं. तो घोड्यांबाबत फार वेडा होता. त्यामुळे असेही मानले जाते की, त्याने त्याच्या घोड्यांच्या वेडा पायी एका घोड्याला राज्यमंत्रीही केलं होतं.

४) टबमध्ये सोन्याचे दागिणे टाकून आंघोळ करत होता

(Image Credit : telegraph.co.u)

जर्मेनिकस म्हणजेच कालिगुला याला सोन्याची फार आवड होती. तो बाथटबमध्ये सोन्याने दागिने आणि नाणी टाकून आंघोळ करत असे. तसेच असेही सांगितले जाते की, तो मोत्यांचं पाणी करून पित असे.

५) मित्रांसमोर पत्नीला नग्न फिरवलं

या सम्राटाने चार लग्ने केली होती. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने एका महिलेला तिच्या लग्नाच्या दिवशीच पळून आणले होते आणि तिच्याशी लग्न केले. तर त्याच्या तिसऱ्या पत्नीचं आधीच दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. त्याची चौथी पत्नी मिलोनिया फार बुद्धिमान आणि सुंदर होती. हेच सिद्ध करण्यासाठी सम्राटाने तिला त्याच्या मित्रांसमोर नग्न करुन फिरवले होते.

या सर्व गोष्टींसोबतच असेही मानले जाते की, गायस ज्यूलिअस सीझर जर्मेनिकसचे त्याच्या बहिणीसोबत शारीरिक संबंध होते. इतकेच नाही तर ज्योतिषाची भविष्यवाणी चुकीची सिद्ध करण्यासाठी एक पुल बांधला होता. ज्यामुळे रोममध्ये दुष्काळ पडला होता. या सम्राटाच्या याच अनेक गोष्टींवर अनेक माहितीपट आणि सिनेमे सुद्धा आले आहेत. 

(वरील सर्व फोटो हे या सम्राटावर आधारित कलिगुला या सिनेमातील आहेत)

टॅग्स :historyइतिहासJara hatkeजरा हटके