शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुगंध अन् फेसही नसणारा...हा आहे 'स्टील'चा साबण, पण तरीही याचा वापर वाढला, कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 17:35 IST

आता अजिबात फेस न येणारा, सुगंध नसलेला आणि स्टीलसारखा दिसणारा साबण बाजारात उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे या साबणाचा वापर केल्यास दुर्गंधी निघून जाते आणि घाणही निघून जाते.

आरोग्याच्या (Health) दृष्टिकोनातून स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं जातं. सध्याच्या काळात बाजारात विविध प्रकारचे साबण, लिक्विड सोप, हॅंडवॉश आदी गोष्टी उपलब्ध आहेत. ही उत्पादनं प्रामुख्याने हात स्वच्छ करण्यासाठी वापरतात. बाजारात उपलब्ध असलेला कोणताही साबण (Soap) तुम्ही हात स्वच्छ करण्यासाठी घेतला तर पाण्याशी संपर्क येताच त्याला फेस (Spume) येतो. तसंच त्याचा सुगंधदेखील येतो. आता यात नवीन काय?, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. खरं तर यात नावीन्य काहीच नाही; पण आता अजिबात फेस न येणारा, सुगंध नसलेला आणि स्टीलसारखा दिसणारा साबण बाजारात उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे या साबणाचा वापर केल्यास दुर्गंधी निघून जाते आणि घाणही निघून जाते.

स्टीलच्या तुकड्यासारखा दिसणारा एक साबण आता बाजारात उपलब्ध झाला आहे. स्टेनलेस स्टील साबण (Stainless steel soap) म्हणूनही हा ओळखला जातो. हा साबण सिल्व्हर कलरचा (Silver Colour) आहे. याचा आकार सर्वसामान्य साबणासारखा आहे; पण या साबणाचा वापर केला असता, त्यातून फेस येत नाही पण दुर्गंधी दूर होते. किमतीचा विचार करायचा झाला तर या साबणाच्या दर्जानुसार याची किंमत ठरवण्यात आली आहे. ई-कॉमर्स वेबसाइट्सनी दिलेल्या माहितीनुसार, या साबणाची किंमत २५० ते ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. तुम्ही हा साबण ऑनलाइन (Online) घरपोच मागवू शकता. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयीची वृत्त दिलं आहे.

हा साबण वापरण्याची खास अशी कोणतीही पद्धत नाही. सर्वसामान्य साबणाप्रमाणेच याचा वापर करता येतो. हात धुताना पाण्याच्या संपर्कात हा साबण आला तरी त्याला फेस येत नाही. हा साबण हातावर घासल्यास हाताची घाण, दुर्गंधी दूर होते. कारण सल्फरचे रेणू या साबणाला चिकटतात. त्यामुळे हा साबणही स्वच्छ करणं आवश्यक आहे.

हा साबण प्रामुख्याने घाण स्वच्छ करण्याचं आणि विचित्र वास दूर करण्याचं काम करतो. तुम्ही किचनमध्ये काम करतेवेळी कांदा चिरला किंवा लसूण सोललं तर हात धुवूनही वास कायम राहतो. पण या साबणाचा वापर केल्यास असा उग्र वासही निघून जातो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके