शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

श्वानाच्या पूजेसाठी उभारलं गेलंय हे मंदिर, जाणून घ्या काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 13:42 IST

श्वान हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. त्यामुळे लोक सहज त्यांच्या घरात या प्राण्याला जागा देतात. पण भारतात असेही काही लोक आहेत जे श्वानांची पूजाही करतात.

नवी दिल्ली : भारतात लोक केवळ देवांनाच नाही तर झाडे, नद्या इतकेच काय तर डोंगरांचीही पूजा करतात. पण असंही एक ठिकाण आहे जिथे श्वानाच्या मूर्तीची पूजा केली जाते. महत्वाची बाब म्हणजे इथे श्वानाचं एक मंदिरही उभारण्यात आलंय. वेगवेगळ्या राज्यातून इथे लोक येऊन श्वानाची पूजाही करतात आणि काही मागणंही मागतात. श्वान हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. त्यामुळे लोक सहज त्यांच्या घरात या प्राण्याला जागा देतात. पण भारतात असेही काही लोक आहेत जे श्वानांची पूजाही करतात. या मंदिरांबाबत वेगवेगळ्या आख्यायिका ऐकायला मिळतात.

कुठे आहे हे श्वानाचं मंदिर

तसे तर तुम्ही आजपर्यंत अनेक वेगवेगळी मंदिरे पाहिली असतील पण आज आम्ही तुम्हाला ज्या मंदिराबाबत सांगणार आहोत ते श्वानाचं मंदिर आहे. छत्तीसगडमध्ये हे अनोखं मंदीर आहे. इथे लोक केवळ श्वानाच्या मूर्तीची पूजाच करत नाही तर काही मागणंही घेऊन येतात. लोकांची धारणा आहे की, इथे काही नवस बोलल्यास तो पूर्ण होतो. 

श्वानाने शोधला होता खजाना

अशी मान्यता आहे की, एका व्यक्तीने आपला श्वान सावकाराकडे गहान ठेवला होता. एक दिवस सावकाराच्या घरी चोरी झाली आणि चोरी गेलेला माल चोरांनी एका जागी लपवला होता. हा माल या श्वानाने शोधून काढला होता. सावकाराने खूश होऊन सर्वांच्या वस्तू परत दिल्या. श्वानाच्या गळ्यावर एक चिठ्ठी बांधून त्याने श्वानाला आपल्या मालकाकडे जाण्यास सोडले. जेव्हा श्वान मालकाकडे पोहोचला तेव्हा त्याला वाटले की, हा सावकाराकडून पळून आलाय. त्यामुळे तो व्यक्ती श्वानाला काठीने मारू लागला. यात श्वानाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या श्वानाच्या गळ्यात असलेली चिठ्ठी वाचली. जेव्हा त्या व्यक्तीला सत्यता कळाली तेव्हा त्याला पश्चाताप झाला आणि त्याने श्वानाची समाधी तयार केली. याच जागेवर कुकरमंदिर तयार करण्यात आलं. तेव्हापासूनच लोक इथे पूजा करण्यासाठी येतात.

इथेही आहे श्वानाचं मंदिर

देशाची राजधानी दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमध्येही असंच एक श्वानाचं मंदिर आहे. गाझियाबादमधील चिपियाना गावात हे मंदिर असून याची मान्यता अशी आहे की, कुणाला जर श्वानाने चावा घेतला तर या मंदिराजवळ असलेल्या तलावात त्या व्यक्तीला आंघोळ करावी लागते. याने त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही. इथेही वेगवेगळ्या राज्यातून लोक पूजा करण्यासाठी येतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdogकुत्राTempleमंदिर