शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

रस्त्यात किलोच्या भावानं विकतायेत नोटांची बंडल; कारण ऐकलं तर विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 17:01 IST

हा जगातील असा देश आहे ज्याची अर्थव्यवस्था केवळ पर्यटनावर टिकून आहे. त्याशिवाय पूर्ण अर्थव्यवस्था कॅशलेस आहे.

आपण घरातून बाहेर पडत बाजारात गेलो तर तिथे सगळीकडे तुम्हाला भाजी मार्केट आणि फळविक्रेते दिसतात. रस्त्यात लावलेल्या दुकानावर अन्य सामानही विकले जाते. आयुष्यात पैसा खूप महत्त्वाचा असतो, विना पैसा आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही. भारतात एटीएमपासून बँकांपर्यंत पैसे सुरक्षित ठेवले जातात. परंतु तुम्ही कधी बाजारात नोटांची बंडल विकताना पाहिलंय का? ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु आम्ही एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे नोटांची बंडल लोक किलोच्या भावाने खरेदी करतात. 

हा जगातील असा देश आहे ज्याची अर्थव्यवस्था केवळ पर्यटनावर टिकून आहे. त्याशिवाय पूर्ण अर्थव्यवस्था कॅशलेस आहे. हा देश आहे उत्तर आफ्रिका खंडातील सोमालीलँड,  १९९१ साली सोमालिया देशापासून वेगळं होऊन काही लोकांनी सोमालीलँड हा नवा देश बनवला होता. आतापर्यंत या देशाला कुठलीही जागतिक मान्यता नाही. एका रिपोर्टनुसार ४० लाख लोकसंख्या असलेला हा देश अत्यंत गरीब आहे. सोमालीलँडचं चलन शिलिंग आहे ज्याची कुठल्याही देशात किंमत नाही. याठिकाणी एक अमेरिकन डॉलर म्हणजे ९ हजार शिलिंग नोट असतात. सोमालीलँडमध्ये शिलिंगच्या ५०० आणि १००० नोट चलनात आहे. 

या देशातील निम्मा भाग वाळवंट आहे तर उर्वरित भागात कायम दुष्काळ पडलेला असतो. या देशातून सर्वात जास्त उंच निर्यात केले जातात परंतु तरीही देशाची अर्थव्यवस्था सुधारली नाही. सर्वात खास गोष्ट म्हणजे इथला बाजार. या बाजारात तुम्हाला फळ, भाज्या कमी परंतु नोटांचे बंडल जास्त विक्रीस दिसतात. याठिकाणी तुम्ही एक सिगारेट घेतली तरी त्यासाठी ५०० ची नोट मोडावी लागते. भाजी खरेदी करायची असेल तर पिशवी भरून नोटांचा ढीग घेऊन जावा लागेल. सोमालीलँड येथे जर मौल्यवान दागिने खरेदी करायचे असतील तर त्यांना गाडी भरून शिलिंग नोटा घेऊन जाव्या लागतील. नोटा रद्दीसारख्या विकल्या जात असल्याने बहुतांश लोक कॅशलेस व्यवहार करतात. 

का विकल्या जातात नोटा?

आपल्या देशातील चलनाचं मूल्य काहीच नसल्याने सोमालीलँड इथले लोक त्यांच्याकडील चलन कमी पैशात विकून ते बर्बाद होण्यापासून रोखतात. अमेरिकेच्या १० डॉलरमध्ये ५० किलो शिलिंग खरेदी केले जाऊ शकते. सोमालीलँड देशात कुठलीही बँकिंग व्यवस्था नाही. संपूर्ण देशात एकही बँक, एटीएम सिस्टम नाही. याठिकाणचे लोक एका कंपनीत पैसे जमा करतात. फोनच्या माध्यमातून सामान खरेदी विकले जाते.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके