शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसमधील अखेरच्या दिवशी त्यानं आणला घोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 21:34 IST

घोडा घेऊन आलेल्या अभियंत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Techie rides a horse to office on last day of workबंगळुरु: ऑफिस सोडताना, तिथल्या माणसांचा निरोप घेताना काहीजण भावूक होतात. निरोपाचं दु:ख आणि त्याचवेळी नव्या संधीचा आनंद अशा काहीशा संमिश्र भावना शेवटच्या दिवशी मनात असतात. मात्र बंगळुरुतील एका अभियंत्याचा ऑफिसमधील शेवटचा दिवस यापेक्षा वेगळा ठरला. कारण हा अभियंता शेवटच्या दिवशी चक्क घोड्यावरुन ऑफिसला आला. सध्या या अभियंत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बंगळुरुतील रिंग रोड परिसरात गुरुवारी एक तरुण घोड्यावरुन ऑफिसला जात होता. या तरुणाचं नाव रुपेश कुमार वर्मा असं असल्याची माहिती बंगळुरुतील एका वृत्तपत्रानं दिली आहे. रुपेश ऍम्बेसी गोल्फ लिंक्समध्ये काम करायचा. 'सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ऑफिसमधील शेवटचा दिवस' असा मेसेज रुपेशनं घोड्यावर लावला होता. रुपेश सकाळी 7 वाजता त्याच्या घरातून ऑफिसला जायला निघाला होता. मात्र शहरातील वाहतूक कोंडी आणि घोड्यानं अधूनमधून घेतलेली विश्रांती यामुळे तो दुपारी 2 वाजता ऑफिसला पोहोचला. रुपेश कुमार वर्माचे घोड्यावरील फोटो व्हायरल झाल्यानंतर एका वृत्तपत्रानं त्याच्याशी संवाद साधला. मूळचा राजस्थानचा रहिवासी असलेल्या रुपेशला नोकरीचा कंटाळा आल्यानं त्यानं राजीनामा दिला. 'सॉफ्टवेअर अभियंते म्हणून आम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी काम करतो. सॉफ्टवेअरशी संबंधित जटिल समस्या सोडवतो. मग हेच काम आम्ही स्वत:च्या देशासाठी का करु शकत नाही? देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्यानं मी नोकरी सोडली. आता स्वत:चं स्टार्टअप सुरू करण्याचा माझा विचार आहे,' असं रुपेशनं सांगितलं. रुपेश घोड्यावर बसून आल्यानं त्याला कंपनीच्या प्रवेशद्वारावर अडवण्यात आलं होतं. मात्र घोडादेखील प्रवासाचं साधन आहे, असं म्हणत रुपेश थेट घोड्याला घेऊन कंपनीच्या कॅम्पसमध्ये शिरला.  

टॅग्स :BengaluruबेंगळूरJara hatkeजरा हटके