घरात सापडली सापाची अंडी

By Admin | Updated: May 20, 2014 02:01 IST2014-05-20T01:47:02+5:302014-05-20T02:01:52+5:30

वसईतील अर्नाळा येथे एका मच्छीमाराच्या घरातच सापाची अंडी सापडल्याने एकच घबराट पसरली आहे.

Snake eggs found in the house | घरात सापडली सापाची अंडी

घरात सापडली सापाची अंडी

नायगाव : वसईतील अर्नाळा येथे एका मच्छीमाराच्या घरातच सापाची अंडी सापडल्याने एकच घबराट पसरली आहे. अर्नाळा येथील बंदरपाडा परिसरात जनार्दन मेहेर यांच्या निवासस्थानात हा प्रकार उघडकीस आला. घराच्या मागच्या बाजूला मच्छीमारीसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात पडलेले असते. या सामानाच्या कोनाड्यात साफसफाई करीत असताना एकूण १३ अंडी सापडली. सर्वप्रथम या अंड्याबाबत संभ्रम होता. निरीक्षण केले असता सर्पाची अंडी असल्याचे निष्पन्न झाले. कुटुंबाची वर्दळ असताना सदर घरात साप अंडी घालून गेला कसा? हा प्रश्न या कुटुंबाला पडला आहे. त्यानंतर या अंड्यांसाठी पुन्हा साप जागेवर येणार हे निश्चित आहे. वास्तविक बंदरे व कोळीवाड्यामध्ये सहसा साप सापडत नाही. (वार्ताहर)

Web Title: Snake eggs found in the house