शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

अख्खं गावच रंगलंय गाण्यात; या गावात गाणं म्हणूनच मारतात हाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 11:19 IST

या गावात जन्मलेल्या प्रत्येकाला नामकरणाबरोबर स्वत:ची एक धूनही मिळते. लोकही ही धून गाऊनच त्या व्यक्तीला हाक मारतात. हे सर्व लोक खासी जमातीचे आहेत. एकदा मिळालेली धून नावाप्रमाणेच आयुष्यभर वापरली जाते.

शिलाँग- म्हण, थोडसं गाणं असा आग्रह करकरूनही गाणं न म्हणणाऱ्या, लाजणाऱ्या मुली किंवा पुरुष  तुम्ही पाहिले असतील. गाणं हे प्रत्येकाचं काम नाही असं आपण धरुन चाललेलो असतो. पण मेघालयातलं एक गाव मात्र एकदम वेगळं आहे. डोंगरदऱ्यांच्या आणि जंगलाच्या कोंदणात वसलेल्या कोंगथाँग या खेड्याजवळ जाताच गाण्यांचे आवाज येऊ लागतात. हे आवाज काही पक्ष्यांनी केलेल कूजन नसते तर ते गावातील लोकांचेच आवाज असतात. या गावात जन्मलेल्या प्रत्येकाला नामकरणाबरोबर स्वत:ची एक धूनही मिळते. लोकही ही धून गाऊनच त्या व्यक्तीला हाक मारतात. हे सर्व लोक खासी जमातीचे आहेत. एकदा मिळालेली धून नावाप्रमाणेच आयुष्यभर वापरली जाते. बालपणी या 'धुनीकरणा'बरोबर नामकरण झालेले असले तरी प्रत्यक्ष नावाचा फारसा उपयोग गावामध्ये तसा फारसा केला जात नाहीच.

या गावामधून तुम्ही नुसता एक फेरफटका मारला तरी असे आवाज झोपड्यांमधून येऊ लागतात. एखादी आई आपल्या मुलाला जेवणासाठी हाक मारत असो वा खेळणारी मुले एकमेकांशी बोलत असोत सर्वजण या सांगितिक भाषेतच संवाद साधताना पाहायला मिळतील. ही सगळी संगीतधून निर्माण करण्याची प्रक्रीया अगदी हृदयापासून सुरु होते असं मत पींडाप्लीन नावाच्या बाई सांगतात. त्यांना तीन मुले असून तिन्ही मुलांशी त्या अशाच संगीतमय भाषेत संवाद साधतात. त्या ३१ वर्षांच्या असून आपल्या मुलांशी असा संवाद साधताना प्रेम व्यक्त केले जाते असे त्यांना वाटते. या गावातील समुदायाचे प्रमुख रॉथेल खोन्गसित या संगितभाषेबद्दल स्वत:चा अनुभव सांगताना म्हणतात, जर माझ्या मुलाने काही चूक केली किंवा त्रास दिला तर मात्र मी रागे भरून त्याला त्याच्या खºया नावाने हाक मारतो. तेव्हा मी प्रेमळ सांगितीक भाषेत बोलत नाही.कोंगथाँग खेडं गेली अनेक शतके उर्वरित जगापासून अलिप्त राहिलं आहे. तेथे जाण्यासाठी भरपूर तासांचे ट्रेकिंग करावे लागते. या गावात २००० साली वीज आली आणि साधा मातीचा रस्ताच मुळी २०१३ साली तयार झाला. दिवसभर गावातील लोक जंगलामध्ये गवत आणि इतर वस्तू गोळा करण्यासाठी जातात त्यामुळं गावात फक्त मुलंच राहातात. जंगलामध्ये लांबलांब असणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुमारे ३० सेंकदांची धून या लोकांना उपयोगी पडते.  आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहातो. जशी पक्ष्यांना , प्राण्यांना स्वत:ची ओळख असते, ते एकमेकांशी विशिष्टप्रकारे संवाद साधतात तसेच आम्हीही साधतो, असे खोन्गसित सांगतात.या प्रथेला जिंगरवाइ लावबेई असे म्हणतात. त्याचा अर्थ आदिमातेचं गाणं असा होतो. खासी जमातीच्या दंतकथांमध्ये आदिमातेचा उल्लेख आहे.

टॅग्स :musicसंगीतJara hatkeजरा हटकेnorth eastईशान्य भारत