शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीचा काळात ऑनलाइन खरेदी करताय? मग, 'हे' काम अजिबात करू नका, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 12:47 IST

या सणासुदीच्या काळात एखादी छोटीशी चूकही लोकांना महागात पडू शकते.

सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. तसेच, येत्या काही दिवसांत देशात अनेक सण येणार आहेत. सण-उत्सवातही लोक भरपूर खरेदी करतात. अशा परिस्थितीत लोकांनी काही गोष्टींबाबत खूप काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना सणासुदीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. या सणासुदीच्या काळात एखादी छोटीशी चूकही लोकांना महागात पडू शकते. अशा परिस्थितीत सणासुदीच्या निमित्ताने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्याबद्दल जाणून घ्या...

सणांच्या काळात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन सेल पाहायला मिळतात. ज्यामध्ये लोक स्वस्त दरात वस्तू खरेदी करू शकतात. मात्र, काही फसवणूक करणारे लोकही याचा फायदा घेऊ शकतात. फसवणूक करणारे ऑनलाइन माध्यमातून लोकांना स्वस्त वस्तूंचे आमिष दाखवतात आणि अशा प्रकारे लोकांची फसवणूक करतात. यासाठी लोकांनी ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, कोणत्याही संशयास्पद लिंक, ऑफर इत्यादींच्या जाळ्यात अडकणार नाही, याकडे पण लक्ष दिले पाहिजे.

अनावश्यक खर्च सणासुदीच्या काळात अनेक ठिकाणी डिस्काउंट ऑफर चालतात. यादरम्यान लोकांना कमी किमतीत अनेक गोष्टी मिळू शकतात. अशा परिस्थितीत, जेव्हाही खरेदीला जाल तेव्हा अनावश्यक खर्च करू नका. दरम्यान, असे होऊ शकते की, एखादी गोष्ट तुम्हाला आकर्षित करेल परंतु तुम्हाला त्याची गरज नाही, त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही त्या  वस्तू खरेदी करू नका आणि अनावश्यक खर्च टाळा.

क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापरतुम्हाला काही अत्यावश्यक वस्तू ऑनलाइन किंवा ऑफलाइन ऑर्डर करायच्या असतील, तर सणासुदीच्या काळात तुम्ही अनेक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे भरून अतिरिक्त डिस्काउंट मिळवू शकता. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही ऑनलाइन खरेदीसाठी जाता किंवा वस्तू मागवता तेव्हा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे कोणत्या ऑफर उपलब्ध आहेत, हे लक्षात ठेवा. याचाही लोक फायदा घेऊ शकतात.

टॅग्स :onlineऑनलाइनShoppingखरेदीcyber crimeसायबर क्राइम