शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! जपानमधल्या या माश्याचं वजन तब्बल २३०० किलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 12:43 IST

कितीही मोठा मासे खाणारा खवय्या असेल तरीही त्याने २३०० किलो वजनी मासा ना कधी खाल्ला असेल ना किती पाहिला असेल.

ठळक मुद्देतुम्ही कधी हजार किलो वजनाचा मासा पाहिलाय का? हजार किलो वजनाचा मासा असतो यावर तुमचा विश्वास बसेल का?आज आम्ही तुम्हाला अशा माशाविषयी सांगणार आहोत ज्याचं वजन तब्बल २३०० किलो आहे.

जपान : तुम्ही कधी हजार किलो वजनाचा मासा पाहिलाय का? किंवा हजार किलो वजनाचा मासा असतो यावर तुमचा विश्वास बसेल का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशा माशाविषयी सांगणार आहोत ज्याचं वजन तब्बल २३०० किलो आहे. झालात की नाही चकीत? या माशाविषयी काही गैरसमज होते, ते गैरसमज आता एका अभ्यासाद्वारे दूर करण्यात आले आहेत. 

आणखी वाचा - डुकराच्या पोटातून मिळाला असा एक दगड ज्याची किंमत आहे कोटींच्या घरात

स्प्रिंगर या संकेतस्थळाने वृत्तानुसार, हा जगातील सगळ्यात वजनी मासा १९९६ साली जपानच्या एका समुद्रात सापडला होता. या माशाचं वजन २३०० किलो असून २.७२ मीटरचा हा मासा आहे. त्यावेळी हा मोला सनफिश असून मोला मोला या प्रजातीतील असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सगळ्यात वजनी मासा म्हणून या माशाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली होती. मोला मोला या प्रजातीतील मासा म्हणूनच या माशाची गिनीज वर्ल्डमध्ये नोंद झाली होती. मात्र या माशाचा एक नवीन अभ्यास समोर आला आहे.  हा मासा वेगळ्याच जातीतला असल्याचा संशय आल्याने यावर सखोल अभ्यास करण्यात आला. हिरोशिमा युनिर्व्हिसिटीच्या या विभागाने या माशावर अभ्यास करून नुकतीच एक माहिती प्रकाशित केली आहे. या माहितीद्वारे या माशाला बोनी फिश म्हणत असून हा मासा मोला अलेक्संड्रिनी या प्रजातीतील असल्याचं सांगण्यात आलं आहं. या माशाविषयीचा हा सगळा अभ्यास एका रिसर्च मासिकात प्रसिद्ध झालाय. हा मासा सापडल्यानंतर तो नक्की कोणत्या प्रजातीतील आहे, याचा अभ्यास करण्यासाठी हिरोशिमा युनिर्व्हिसिटीतील विभागाने जवळपास जगभरातील एक हजारापेक्षा जास्त पुरावे तपासले. त्यातील काही पुरावे हे पाचशे वर्षांपूर्वीचे होते. 

अशाच इतर जरा हटके बातम्यांसाठी येथे क्लिक करा

(फोटो - प्रातिनिधीक)

या माशाचं वैशिष्ट्य म्हणजे, या माशांची खवलं ही इतर माश्यांसारखी बनलेली नसून हाडांपासून बनलेली दिसतात. शार्क आणि रेस माशांचीही खवलं हाडांपासून बनलेली असतात. त्याचप्रमाणे जगातील हा सगळ्यात वजनी मासा असला तरीही महासागराच्या खोल तळाशी आणखी वजनी मासे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २००४ सालीही एका संशोधकाला या प्रजातीतील मासा सापडला होता. मात्र तो मासा इतका वजनी नव्हता. या जातीतील माशांचे वजन दोन हजार किलोपेक्षाही जास्त असतं. त्यामुळे हा मासा पहिल्यांदाच दिसला असला तरीही याप्रकारचे अनेक मासे समुद्राच्या तळाशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJapanजपानIndiaभारत