शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

५० वर्षीय चीनी व्यक्तीचा खतरनाक कारनामा, सिगारेट ओढता ओढता पूर्ण केली ४२ किमीची मॅरेथॉन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 10:23 IST

Chinese Man Marathon: सध्या त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Chinese Man Marathon: मॅरेथॉन धावण्याचा उद्देश फिटनेसला प्रोत्साहन देणे आणि आरोग्य सुधारणे हा आहे. मॅरेथॉन धावणे सोपे नाही. यासाठी प्रशिक्षण आणि निरोगी जीवनशैलीप्रती वचनबद्धता आवश्यक आहे. जे मॅरेथॉन धावतात ते लोक आरोग्याबाबत सर्वात जागरूक मानले जातात. मात्र, 'अंकल चेन' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चिनी धावपटूने चेन-स्मोकिंग करताना मॅरेथॉन पूर्ण केली. त्यांचे मॅरेथॉनमध्ये धावतानाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

रिपोर्ट्सनुसार ४२ किलोमीटरची 'झिनजियांग मॅरेथॉन' चीनच्या जिआंदे शहरात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जवळपास १ हजार धावपटू सहभागी झाले होते. त्याच ५० वर्षांची ही व्यक्तीही सहभागी झाली होती. मॅरेथॉन दरम्यान धावताना ते एका मागोमाग एक सिगरेटही ओढत होते.

३ तास २८ मिनिटांत मॅरेथॉन पूर्णमीडिया रिपोर्ट्सनुसार, ५० वर्षीय चेन यांनी ६ नोव्हेंबर रोजी चीनमधील जिआंदे येथे स्मोकिंग करत करतच ४२ किमीची मॅरेथॉन पूर्ण केली. स्पर्धेत भाग घेतलेल्या सुमारे १५०० धावपटूंपैकी ५७४ वे स्थान त्यांनी मिळवलं. त्यांनी तीन तास 28 मिनिटांत ही मॅरेथॉन पूर्ण केली. सिगारेट ओढत असतानाच त्यांनी हा कारनामा केला. त्यांचे सर्व फोटो सर्वप्रथम Weibo या चिनी सोशल मीडिया अॅपवर व्हायरल झाली, ज्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, कार्यक्रमाच्या आयोजकांनीही नंतर त्यांचे फिनिशिंग सर्टिफिकेट वाटून त्यांच्या यशाचा आनंद साजरा केला.

यापूर्वीही त्यांनी मॅरेथॉन केली होती पूर्णते अंकल चेन या नावाने प्रसिद्ध आहेत. रनिंग मॅगझिनच्या मते, त्यांनी २०१८ मध्ये ग्वांगझू मॅरेथॉन आणि २०१९ मध्ये झियामेन मॅरेथॉन अशीच स्मोकिंग करत पूर्ण केली होती. त्यांनी २०१८ मध्ये ३:३६ तासांत आणि २०१९ मध्ये ३:३२ तासांत मॅरेथॉन पूर्ण केली. रिपोर्टनुसार अंकल चेन यांनी अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये देखील भाग घेतला होता. ज्यामध्ये त्यांनी १२ तासांत ५० किमीचे अंतर पार केले होते.

टॅग्स :chinaचीनMarathonमॅरेथॉन