शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 16:46 IST

Government workers punished with pay cut : कर्मचाऱ्याला ऑफिसमधून २ मिनिटं लवकर निघाल्यामुळे आपला पगार गमावावा लागला आहे.

तुम्ही कधी विचार केलाय का? जर समजा तुम्ही ऑफिसमध्ये वेळेच्या दोन मिनिटं लवकर निघालात आणि तुमचा पगार कापला  गेला तर काय होईल. होय ही वास्तविक घटना वाचून तुम्हीलाही प्रश्न पडेल. आपले ८ किंवा ९ तास पूर्ण होण्याच्या २ मिनिटं आधी लॉग आऊट करणं कोणता गुन्हा नाही. पण जपानच्या एका सरकारी कर्मचाऱ्याला ऑफिसमधून लवकर निघणं चांगलच अंगाशी आलं आहे. जगभरात अशी अनेक कार्यालयं आहेत जिथं काम संपल्यानंतर ऑफिसमधून जाण्यास परवागनी आहे. पण जपानच्या एका कर्मचाऱ्याला ऑफिसमधून २ मिनिटं लवकर निघाल्यामुळे आपला पगार गमावावा लागला आहे.

रिपोट्नुसार चिंबा प्रान्तातील फनाबाशी सिटी बोर्ड ऑफ एज्यूकेशनच्या स्फाफ मेंबरर्सना ऑफिसमधून लवकर निघाल्यामुळे पगार कापला जाण्याची शिक्षा मिळाली आहे. द सानकेई न्यूजच्या रिपोर्टनुसार व्यवस्थापनाकडून मे २०१९ आणि जानेवारी २०२१ मध्ये ३१६ लोकांच्या ऑफिसमधून लवकर निघण्याच्या प्रकारकडे दुर्लक्ष केलं होतं. 

जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक्

त्यानंतर त्यांनी एक्झिट टाईमवर लक्ष दिल्यास दिसून आलं की, लोक चुकीची माहिती भरत आहेत. जेणेकरून ऑफिसमधून लवकरात लवकर बाहेर पडता येईल. ३१६ लोकांनी आपल्या कार्डवर एंट्री करत चुकीची माहिती भरली होती. वारंवार घडत असलेल्या या गैरप्रकाराची दखल घेत पगारातून १/१० भाग कपात करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. 

 Video : कमाल! नियम मोडणाऱ्यांना लांबूनच असं ओळखतात ट्रॅफिक पोलिस; पाहा व्हायरल व्हिडीओ

समोर आलेल्या माहितीनुसार पगात कपातीला वैतागून एका महिलेनं आपल्या लॉग आऊट वेळेच्या दोन मिनिटं आधी ऑफिसमधून निघाली कारण तिला बसही पकडायची होती. सोशल मीडियावर ही घटना तुफान व्हायरल होत असून शेकडो युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलJapanजपानjobनोकरी