Shocking! Dead woman found alive in punjab hospital | डॉक्टरने जिवंत महिलेला मृत सांगत फ्रिजरमध्ये ठेवलं, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक्
डॉक्टरने जिवंत महिलेला मृत सांगत फ्रिजरमध्ये ठेवलं, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक्

पंजाबच्या कपूथलामध्ये एक अजब घटना समोर आली आहे. येथील एका खाजगी रूग्णालयात डॉक्टरने असाकाही कारनामा केला की, डॉक्टरांवरील विश्वासच उठेल. डॉक्टरने एका जिवंत महिलेला मृत सांगून फ्रिजरमध्ये ठेवलं आणि पुढे जे घडलं ते अविश्वसनिय आहे. 

१४ मे रोजी ही घटना घडली. डॉक्टरने ६५ वर्षीय एक महिलेला मृत घोषित करून मोर्चरीच्या फ्रिजरमध्ये ठेवलं. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकाच्या असं लक्षात आलं की, महिलेच्या गळ्यात सोन्याची चेन तशीच राहिली आहे. जेव्हा नातेवाईक चेन घेण्यासाठी परत गेले तेव्हा महिलेचा श्वास सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. 

नातेवाईकांनी लगेच महिलेला फ्रिजरमधून बाहेर काढलं आणि पाणी पाजलं. नंतर डॉक्टरांना याबाबत सांगण्यात आलं. डॉक्टरांनी डोळ्याहून पट्टी काढली आणि डोळ्यांवर पाणी शिंपडलं. त्यानंतर नातेवाईक महिलेला घरी घेऊन गेले. 

घरी घेऊन गेल्यावर महिलेची तब्येत अधिक जास्त बिघडली. त्यांना पुन्हा कपूरथला येथील सरकारी रूग्णालयात नेण्यात आलं. तिथे १५ मे रोजी महिलेचा मृत्यू झाला. तेच पोलिसांनी यावर सांगितले की, त्यांना याबाबत काहीच माहिती नाही. पण हा विषय शहरात चर्चेचा ठरत आहे. 


Web Title: Shocking! Dead woman found alive in punjab hospital
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.