शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळाला मिळाला एक कोटीचा दगड, पण झाला नाही कोट्याधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 19:06 IST

इग्लंडमधील एका मेंढपाळाला दगड मिळाला. तोही तब्बल १ कोटींचा. काय केलं नेमकं त्याने या दगडासोबत?

नशीबाची कृपा झाली की काय काय नाही घडू शकत. तुम्हाला लहानपणीची लाकुडतोड्याची गोष्ट आठवते का? त्याची कुऱ्हाड पाण्यात पडल्यानंतर देवी त्याला सोन्याची, चांदीची कुऱ्हाड देऊ इच्छिते मात्र तो लाकडाचीच कुऱ्हाड घेतो. अशीच काहीशी घटना युकेमधील कॉटस्वोल्ड भागातील मेंढपाळासोबत घडली आहे. आपल्या मेंढ्या चरायला घेऊन गेला असताना. त्याच्यासोबत अशी काही गोष्ट घडली की म्हटलं तर तो रातोरात करोडपती होऊ शकला असता. पण तसं झालं नाही. त्यानेच हे होऊ दिलं नाही. का बरं? वाचा पुढे...

तर त्याचं असं झालं की हा मेंढपाळ नेहमीप्रमाणे रानात त्याच्या मेंढ्या चरायला घेऊन गेला. तोच त्याला जमिनीवर काहीतरी जोरदार आदळल्याचा आवाज आला. काय आदळले म्हणून तो पहावयास गेला तर १०३ किलोचा दगड त्याला पडलेला दिसला. याची माहिती मिळताच चार-पाच वैज्ञानिकांचा समुह त्याच्या घरी त्याला भेटायला गेला. तो दगड नीट तपासून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले हा दगड साधासुधा नव्हता तर या दगडाची किंमत तब्बल १ करोडच्या आसपास होती. तुम्ही हे वाचून जसे अवाक् झालात त्यापेक्षा तो मेंढपाळ आश्चर्यचकित झाला. आ वासून वैज्ञानिकांकडे पाहु लागला. त्याला कधी स्वप्नातही वाटलं नसेल की तो करोडपती होईल.

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की एका दगडाची किंमत १ करोड कशी असेल? पण तो दगड होता उल्कापाताचा तुकडा. जो चार अब्ज (बिलियन) वर्षापूर्वीपासून आवकाशात तरंगत होता. या दगडावर संशोधन केल्यानंतर अवकाशातील अत्यंत महत्वाच्या माहितीचा उलगडा होणार होता. अवकाशाशी संबधित आणि पृथ्वीवरील माणसांशी निगडीत अनेक गुपिते या दगडामुळे उलगडली जाणार होती.या दगडाचे नाव ‘Winchcombe meteorite’असे ठेवण्यात आले. याबदल्यात वैज्ञानिकांनी त्याला १ करोड रुपये देऊ केले. पण मेंढपाळ वर सांगितलेल्या लाकुडतोड्याच्या गोष्टीतील लाकुडतोड्याप्रमाणे प्रामाणिक होता. त्याने क्षणाचाही अवधी न लावता हा दगड दान देऊन टाकला. संशोधकांनी त्याला देऊ केलेले एक करोड रुपयेही त्याने घेतले नाही.

हा दगड एखाद्या ज्वलंत  उल्केप्रमाणे कोसळत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. असा दगड यापूर्वी कधीही पृथ्वीवर सापडला नव्हता. तसेच अत्यंत दुर्लभ आणि महत्त्वाचा हा दगड आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके