लग्नाच्या दिवशीच ती मुंडण करून आली
By Admin | Updated: July 8, 2017 00:46 IST2017-07-08T00:46:50+5:302017-07-08T00:46:50+5:30
ही घटना आहे लंडनमधील. के्रग लायन्स आणि जोआन यांच्या प्रेमाची. दोघेही एकमेकांना किशोरवयीन असल्यापासून ओळखत होते.

लग्नाच्या दिवशीच ती मुंडण करून आली
ही घटना आहे लंडनमधील. के्रग लायन्स आणि जोआन यांच्या प्रेमाची. दोघेही एकमेकांना किशोरवयीन असल्यापासून ओळखत होते. पण, जोआनसोबत प्रेम असल्याचे सांगण्यासाठी त्याला जवळपास २० वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर दोघांचा विवाह निश्चित झाला.
पण, नियतीने त्यांच्यासमोर काही वेगळेच लिहून ठेवले होते. या जोडप्याला तेव्हा धक्का बसला जेव्हा हे समजले की, क्रेग याला कॅन्सर असून तो अखेरच्या स्टेजला आाहे. पण, ते खचले नाहीत.
जोआनही खंबीरपणे त्याच्या मागे उभी राहिली. के्रग आता फार तर वर्षभर जगणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
जोआनने खचून न जाता विवाहाची तारीख निश्चित केली आणि के्रगच्या पाठीशी आपण आहोत हे दाखवून देण्यासाठी लग्नाच्या दिवशीच ती मुंडण करून आली. त्या वेळी उपस्थितांनीही आपल्या अश्रूंना वाट करून दिली. विवाहानंतर ख्रिसमसच्या दिवशीच के्रगचा झालेला मृत्यू अनेकांना चटका लावून गेला.