इराकमधील रक्तपात बघून पत्नी व मुलाची केली निर्घृण हत्या

By Admin | Updated: September 2, 2014 18:07 IST2014-09-02T18:07:00+5:302014-09-02T18:07:00+5:30

इराकमध्ये होणारा रक्तपात बघून पंजाबमधील २५ वर्षाच्या तरुणाने स्वतःच्या पत्नी व चार वर्षाच्या निर्घूणपणे हत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Seeing the blood in Iraq, the murderous murder of a wife and child | इराकमधील रक्तपात बघून पत्नी व मुलाची केली निर्घृण हत्या

इराकमधील रक्तपात बघून पत्नी व मुलाची केली निर्घृण हत्या

ऑनलाइन लोकमत
कुमांउ (पंजाब), दि. २ - इराकमध्ये होणारा रक्तपात बघून पंजाबमधील २५ वर्षाच्या तरुणाने स्वतःच्या पत्नी व चार वर्षाच्या निर्घूणपणे हत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पत्नी व मुलाची हत्या केल्यावर त्या तरुणानेही आत्महत्या केली आहे.  
दलजीत सिंग हा २५ वर्षाचा तरुण रामघरीया गुरुद्वारा या संस्थेत रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होता. इराकमध्ये निष्पाप जनतेवर होणारे अमानुष अत्याचार व रक्तपात बघून दलजितचे मानसिक संतूलन ढासळले होते.  दलजीतने पत्नी राजदीप कौर व मुलगा गुरुमेहताब सिंगवर चाकूने वार करुन त्यांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.  सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास  दलजीतचा भाऊ रणजित सिंग हा त्यांच्या घरी आला. मात्र दरवाजा उघडत नसल्याने रणजित सिंग यांना संशय आला व त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.


 

Web Title: Seeing the blood in Iraq, the murderous murder of a wife and child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.