शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! यूट्यूबरने दिलं होतं दारू पिण्याचं चॅलेंज, १.५ लीटर वोडका पिऊन व्यक्तीचा LIVE मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 13:38 IST

द इंडिपेडेंटच्या रिपोर्टनुसार, दादाजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रशियन व्यक्तीला एका यूट्यूबरने हे चॅलेंज दिलं होतं.

कोणत्याही गोष्टीची अति केली की नुकसानच होतं हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. असंच काहीसं रशियातील एका ६० वर्षीय व्यक्तीसोबत झालं आहे. एका यूट्यूबरने दारू पिण्याचं चॅलेंज दिलं होतं. यात या ६० वर्षीय व्यक्तीने १.५ लीटर वोडका प्यायली. ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

६० वर्षीय व्यक्तीने यूट्यूब लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान जास्तीत जास्त दारू पिण्याचं चॅलेंज स्वीकारलं होतं आणि ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी १.५ लिटर वोडका प्यायला. हा सगळा प्रकार लाइव सुरू होता. लोकांना या व्यक्तीला दारू पिताना मरताना पाहून धक्का बसला. (हे पण वाचा : दुबईमधील अजब घटना, केवळ 'हा' एक शब्द बोलल्याने ब्रिटिश महिलेला टाकलं तुरूंगात; असं काय म्हणाली ती?)

द इंडिपेडेंटच्या रिपोर्टनुसार, दादाजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रशियन व्यक्तीला एका यूट्यूबरने हे चॅलेंज दिलं होतं. या चॅलेंजला थ्रॅश स्ट्रीम किंवा ट्रॅश स्ट्रीम नावाने ओळखलं जातं. यात एखाद्या व्यक्तीला पैशांच्या बदल्यात अपमानजनक काम किंवा स्टंट करण्याचं चॅलेंज दिलं जातं. याचं लाइव स्ट्रीमिंग केलं जातं. लाखो लोक हे ऑनलाइन बघत असतात. (हे पण वाचा : बाबो! 'या' रॅपरने कपाळावर लावला १७५ कोटी रूपयांचा हिरा, लोक म्हणाले - 'देवाने तुझं डोकं वाचवावं')

द इंडिपेंडेंटने स्थानिक मीडियाच्या हवाल्याने वृत्त दिलं की, या ६० वर्षीय रशियन व्यक्तीचं नाव यूरी दुशेकिन आहे. त्याला एका यूट्यूबरने पैशांच्या बदल्यात दारू पिण्याची किंवा गरम सॉस खाण्याचं चॅलेंज दिलं होतं. रशियन मीडियानुसार, १.५ लिटर वोडका सेवन केल्यावर ही व्यक्ती खाली पडली आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचं मृत शरीर लाइव स्ट्रीमिंगमध्ये दिसत होतं. प्रेक्षक त्याला मरताना बघत होते.

रशियन अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात स्मोलेंक्स शहरमध्ये घडलेल्या या घटनेचा तपास सुरू केला आहे. दरम्यान रशियन सीनेटर एलेक्सी पुष्कोव यांनी अशा घटनांवर बंदी आणण्यासाठी कायदा तयार करण्यावर जोर दिलाय.  

टॅग्स :russiaरशियाJara hatkeजरा हटकेYouTubeयु ट्यूब