शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जगातली सगळ्यात मोठी क्रूज शिप, जहाजावरच आहे वॉटर पार्क आणि 9 स्वीमिंग पूल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 17:13 IST

Royal Caribbean’s Icon of the Seas : नुकतेच जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रूजचे फोटो समोर आलेत. हे जहाज इतकं मोठं आहे की, जणू जहाजावरच एखादं मोठं शहर वसवलं.  हे जहाज पुढील वर्षी पाण्यात उतरवलं जाणार आहे.

Royal Caribbean’s Icon of the Seas : जसजशी टेक्नॉलॉजी अधिक विकसित होत जाते नवनवीन लक्झरी वस्तू बाजारात येतात. लोकांना वेगळा अनुभव देण्यासाठी आणि त्यांचं जगणं सोपं करण्यासाठी या गोष्टी तयार केल्या जातात. काही वस्तू तर अशा असतात ज्या बघून विश्वासच बसत नाही. काही वर्षाआधी समुद्रात छोट्या छोट्या क्रूजवर प्रवास करून लोक आनंदी व्हायचे. पण आता लक्झरी या शब्दाचा अर्थच फार व्यापक झाला आहे.

नुकतेच जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रूजचे फोटो समोर आलेत. हे जहाज इतकं मोठं आहे की, जणू जहाजावरच एखादं मोठं शहर वसवलं.  हे जहाज पुढील वर्षी पाण्यात उतरवलं जाणार आहे. याचं नाव आहे Royal Caribbean’s Icon of the Seas. याची खासियत म्हणजे यावर तुम्हाला वॉटर पार्क सोबतच 9 स्वीमिंग पूलही दिसतील. 

या जहाजावर त्या सगळ्या सुविधा मिळतील ज्या एखाद्या शहरात राहण्यासाठी गरजेच्या असतात. हे विशाल जहाज पुढील वर्षी पाण्यात उतरणार असलं तरी बनून पूर्ण तयार आहे. या जहाजाचं सौंदर्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे जहाज अनेक दृष्टीने रेकॉर्ड ब्रेकिंग आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यावर वॉटर पार्कही आहे. 

इतकंच नाही तर या जहाजाच्या आत साधारण 40 रेस्टॉरन्टही आहेत. हे जहाज फिनलॅंडमध्ये तयार केलं जात आहे. सध्या जहाज तयार होण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. हे जहाज आतापर्यंतचं सगळ्यात मोठं जहाज आहे. याचं वजन शंभर लाख टनांपेक्षा जास्त आहे.

ज्या कंपनीने हे जहाज तयार केलं त्या कंपनीने याआधी याची सिस्टर शिप पाण्यात उतरवली आहे. सांगण्यात येत आहे की, पुढील वर्षाच्या सुरूवातीला हे जहाज पाण्यात उतरवलं जाईल. यावर एकाचवेळी 5 हजार 610 प्रवासी बसवले जातील.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स