शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ही आहेत पुण्यातील रोमँटीक स्थळं , तुम्ही इथे जाऊन आलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 16:02 IST

आपली सुट्टी किंवा विकेंडला पुण्यात धमाल करण्यासाठी या ठिकाणांची माहिती असलेली बरी.

ठळक मुद्देपुणे तिथे काय उणे?पुण्यात तशी भरपूर पर्यटन स्थळं आहेत आणि सोबत रोमान्स पॉईंटही आहेत.पुण्यात आपली सुट्टी याठिकाणी व्यतीत करा.

पुण्यात तशी भरपूर पर्यटन स्थळं आहेत. तुम्ही कूटुंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत तिथे जाऊ शकतो. पण म्हणतात, पुणे तिथे काय उणे? याच पुण्यात काही रोमान्स पॉईंटपण आहेत. आपली सुट्टी किंवा विकेंड पुण्यात व्यतीत करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणांची माहिती असलेली बरी.

एम्प्रेस गार्डन

पुण्यातील रेस कोर्सच्या बाजूला हे एम्प्रेस गार्डन आहे. सुंदर फळा-फुलांच्या झाडांच्या सानिध्यात ही बाग असल्याने अनेक प्रेमीयुगूलांना येथे यायला आवडतं. विविध झाडांनी संपन्न या बागेत अगदी शांत व प्रसन्न वाटतं. 

पर्वती हिल

पर्वती हिलच्या सौंदर्याविषयी तुम्हाला नव्याने काही सांगण्याची गरज नाही. समुद्र तळापासून २१०० फुट उंचावर असणाऱ्या या पर्वतीवरुन पुण्यातील काही भाग दिसतो. पेशवांच्या एका वंशाने बांधलेलं एक जुनं मंदिरही तिथे अस्तित्वात आहे. थंड  वाऱ्याची झुळुक  येथे सतत सुरु असल्याने छान रोमँटिक मूड येथे जाणवत राहतो. 

खडकवासला धरण

पुण्यातील २० किलोमीटर परिसरात असलेल्या खडकवासला धरणाजवळ अनेकजण येतात. शहरातल्या गडबडीच्या युगातून थोडंसं शांत होण्यासाठी येथे अनेक प्रेमीयुगुल येतात. 

ओशो गार्डन

कोरेगाव पार्कमध्ये वसलेलं हे ओशो गार्डन विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. पुण्यातील सर्वात सुंदर आणि शांत म्हणून या गार्डनची ओळख आहे. शहरात वसेलेलं हे गार्डन आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातं. त्यामुळे प्रेमीयुगूलं इकडे अवश्य भेट देतात.

बुंद गार्डन

पुणे रेल्वे स्थानकापासून अगदी २ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बुंद गार्डनला महात्मा गांधी गार्डन म्हणूनही ओळखलं जातं. शिवाय येथे बोटीवरुनही सफारी करता येते. बगिचा आणि तलाव या सुविधांचा मिलाफ येथे असल्याने आणि स्थानकापासून जवळ असल्याने मुंबई शहरातूनही अनेक प्रेमीयूगुल येथे येत असतात. तसेच मनोरंजनासाठी अनेक साधनंही येथे उपलब्ध आहेत.

मुळशी नदी

कित्येक प्रेमीयुगुलांना नदी किनारी बसून एकमेंकासोबत वेळ व्यतीत करण्याची इच्छा असते. त्यासाठी मुळशी नदी एक सुंदर उदाहरण आहे. सह्याद्री पर्वतांमधून वाहणारी ही शांत नदी तिच्या आजूबाजूच्या परिसरातही शांतता पसरवत वाहते. त्यामुळे निसर्ग सौंदर्याने वेढलेल्या या रोमँटिक जागेला एकदा नक्की भेट द्या. तसेच येथे नौकाविहारही करता येतं. 

ओकयाम फ्रेंडशिप गार्डन

पु.ल. देशपांडे उद्यान या नावानेही या गार्डनला ओळखलं जातं. जपानी संस्कृतीनुसार हे गार्डन बांधण्यात आलं आहे. या गार्डनमध्ये तुम्ही अनवाणी पायाने चाललात तर तुम्हाला अधिक आनंद मिळेल. हे गार्डन म्हणजे एक अद्भूत नजारा  आहे, असं येथे जाऊन आलेले पर्यटक सांगतात. त्यामुळे तुम्हीही निसर्गाचा चमत्कार पाहायला एकदा नक्की भेट द्या.

टॅग्स :Puneपुणेtourismपर्यटन