शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Richest Pets of the World: 4000 कोटींचा कुत्रा तर 800 कोटींची मांजर...हे आहेत जगातील सर्वात महाग प्राणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 21:09 IST

Richest Pets of the World: 800 कोटींची मांजर अमेरिकेची लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्ट हिची आहे.

पाळी प्राण्यांच्या किंमतीशी संबंधित सोशल मीडिया स्टडीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या स्टडीमध्ये कुत्रा-मांजराची किंमत करोडोंमध्ये सांगितली गेली आहे. यातील अनेक प्राण्यांना 'सेलिब्रेटी'चा दर्जा आहे. विशेष म्हणजे, या यादीतील एका कुत्रा हजारो कोटींचा आहे. 'ऑल अबाऊट कॅट्स'च्या अहवालात या प्राण्यांबद्दल सांगण्यात आले आहे.

अमेरिकेची लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्टकडे(Taylor Swift) ऑलिव्हिया बेन्सन नावाची स्कॉटिश फोल्ड जातीची मांजर आहे. हा जगातील तिसरा सर्वात महागडा प्राणी असल्याचा दावा केला जात आहे. या मांजराची किंमत 800 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे.

दुसऱ्या क्रमांकावरही एक मांजर आहे. या मांजरीचाही सोशल मीडियावर मोठा प्रभाव आहे. तिचे नाव नाला कॅट असून, ती इन्स्टाग्रामवर @Nala_cat या नावाने लोकप्रिय आहे. या मांजरीचे इंस्टाग्रामवर 44 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. रिपोर्टमध्ये नालाची किंमत 825 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. नालाचे नाव 'गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही नोंदवले गेले आहे.

महागड्या प्राण्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा गुंथर VI. त्याची मालकी इटालियन कंपनी गुंथर कॉर्पोरेशनकडे आहे. त्याची किंमत 4000 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. 'न्यूयॉर्क पोस्ट'च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, या प्राण्यांची यादी इंस्टाग्राम अॅनालिटिक्सच्या आधारे तयार करण्यात आली आहे, दररोज एका सोशल मीडिया पोस्टवरून प्राणी किती कमावतात? यादी बनवताना या गोष्टी लक्षात ठेवण्यात आल्या आहेत.

जाणून घ्या जगातील सर्वात महागड्या प्राण्यांबद्दल...टेलर स्विफ्टच्या मांजरीनंतर जगातील सर्वात महागड्या प्राण्यांमध्ये प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही होस्ट ओप्रा विन्फ्रेचे कुत्रे शेडी, सनी, लॉरेन, लायला आणि ल्यूक यांचा समावेश आहे, ज्याची किंमत सुमारे 250 कोटी आहे. पोमेरेनियन जातीचा जिफपोम नावाचा कुत्रा चौथ्या क्रमांकावर असून त्याची किंमत 200 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. जर्मन फॅशन डिझायनर कार्ल लेजरफेल्डची मांजर पाचव्या क्रमांकावर आहे, तिची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. प्रसिद्ध अभिनेत्री बेटी व्हाईटच्या कुत्र्याची किंमत 40 कोटींहून अधिक नोंदवण्यात आली आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल