शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इथे आढळून आला दोन तोंडाचा दुर्मीळ साप, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 16:59 IST

Two Headed Snake : या रात्री फिरणारा साप आहे. तो विषारीही नसतो. सामान्यपणे त्यांची लांबी 30 इंच असते. पण हा दोन तोंड्या साप केवळ 30 सेंटीमीटरचा आहे. म्हणजे हा साप पिल्लू आहे.

Two Headed Snake : दक्षिण आफ्रिकेच्या वेदवे भागात एक दुर्मीळ  दोन तोंड असलेला साप पकडण्यात आला आहे. जिथे हा साप आढळून आला तेथील त्या जागेच्या मालकाने त्याला काचेच्या भांड्यात ठेवलं होतं. त्यानंतर सर्पमित्र निक इवांसला बोलवलं. जेणेकरून तो सापाला घेऊन जाऊ शकेल. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर सापाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी लिहिलं की, उत्तर डर्बनच्या ब्राय भागात होतो. तेव्हा मला वेदवेहून काही फोटो आले. हे फोटो दोन तोंड्या सापाचे होते. हा एक साउदर्न ब्राउन एग ईटर साप आहे. तो कोणतंही नुकसान पोहोचवत नाही.

या रात्री फिरणारा साप आहे. तो विषारीही नसतो. सामान्यपणे त्यांची लांबी 30 इंच असते. पण हा दोन तोंड्या साप केवळ 30 सेंटीमीटरचा आहे. म्हणजे हा साप पिल्लू आहे. निक इवांस यांनी सांगितलं की, दोन तोंड असलेल्या सापांसोबत एक मोठी समस्या असते. ती म्हणजे कोणत्या दिशेने जायचं. एका डोकं दुसऱ्या दिशेला तर दुसरं दुसऱ्या दिशेला जात असतं. 

(Image Credit : Nick Iwans)

निक यांना आढळून आलं की, हा साप झोपताना एका डोक्यावर दुसरं डोकं ठेवतो. हा साप अंडी खातो. याला दात नसतात, पण तरीही तो एकदाच अनेक अंडी खाऊ शकतो. इतकंच काय तर पूर्ण अंडही गिळू शकतो. 

सामान्यपणे दोन तोंड असलेले साप कमीच बघायला मिळतात. या स्थितीला बायसिफॅली असं म्हणतात. जेव्हा हे जुळे जन्मावेळी वेगळे होऊ शकत नाही तेव्हा अशी स्थिती तयार होते. दहा हजार सापांमध्ये अशी एक केस असते. पण असे साप जास्त काळ जिवंत राहण्याची शक्यता कमीच असते. 

(Image Credit : Nick Iwans)

हा दोन तोंड्या साप आता निक इवांसकडून प्रोफेशनल लोकांकडे देण्यात आला. ते त्याच्या आरोग्याची काळजी घेतील. काही दिवस त्याच्यावर अभ्यास करून त्याला जंगलात सोडतील. कारण वैज्ञानिकांना वाटतं की, त्याने जास्त काळ जगावं, त्यासाठी त्याला जंगलात सोडावं लागेल. 

टॅग्स :snakeसापSouth Africaद. आफ्रिकाJara hatkeजरा हटके