लोकलमध्ये ७० वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
By Admin | Updated: December 13, 2015 22:25 IST2015-12-13T20:38:28+5:302015-12-13T22:25:17+5:30
चालत्या लोकल ट्रेनमध्ये ७० वर्षीय महिलेशी गैरवर्तन आणि विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार विरार-चर्चगेट लोकलमध्ये शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली आहे.

लोकलमध्ये ७० वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
>ऑनलाइन लोकमत
विरार, दि. १३ - चालत्या लोकल ट्रेनमध्ये ७० वर्षीय महिलेशी गैरवर्तन आणि विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार पच्छिम रेल्वेच्या विरार-चर्चगेट लोकलमध्ये शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडला आहे. रेल्वे पोलिसांना अरोपीस अटक करण्यात यश आले आहे.
विरार - चर्चगेट लोकलमधील लगेजच्या डब्यात महिला एकटीच प्रवास करत असल्याचा फायदा घेऊन 22 वर्षीय अमित कुमार झा या नराधमाने विरारहून ट्रेन निघाल्यानंतर महिलेची छेडछाड करण्यास सुरुवात केली. ट्रेन भाईंदरला पोहचताच नराधम अमितकुमारने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
परंतु, गाडी भाईंदर स्थानकात येताच महिलेने आरडाओरडा करण्यासा सुरुवात केली. त्यानंतर स्टेशनवर असणाऱ्या प्रवाशांनी आरोपीस पकडून चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आला आहे. परंतु, या घटनेमुळे मुंबईतील रात्रीच्या लोकल प्रवासावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.