शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

एक असं रेल्वे स्टेशन जिथे नाही एन्ट्री किंवा एक्झिट गेट, मग कशासाठी उभारलं गेलंय हे स्टेशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:49 IST

Interesting Facts : महत्वाची बाब म्हणजे या स्टेशनवर रेल्वे थांबते आणि लोकही चढतात-उरतात सुद्धा. याच कारणाने हे स्टेशन जगभरात चर्चेत आहे.

Interesting Facts : रेल्वेचा प्रवास सगळ्यात आरामदायक, स्वस्त आणि सुरक्षित मानला जातो. रेल्वेने प्रवास करताना वेगवेगळे स्टेशन, गर्दी, प्लॅटफॉर्म, लिफ्ट दिसणं फारच कॉमन आहे. सामान्यपणे प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांना ये - जा करण्यासाठी एन्ट्री आणि एक्झिट गेट असतातच. या गेट्सवर सुरक्षा व्यवस्थाही असते. एकाच रेल्वे स्टेशन अनेक गेट्सही असू शकतात. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एक रेल्वे स्टेशन असंही आहे ज्याला ना एन्ट्री गेट आहे, ना एक्झिट गेट. महत्वाची बाब म्हणजे या स्टेशनवर रेल्वे थांबते आणि लोकही चढतात-उरतात सुद्धा. याच कारणाने हे स्टेशन जगभरात चर्चेत आहे.

एन्ट्री - एक्झिट नसलेलं स्टेशन

हे अनोखं रेल्वे स्टेशन इतर स्टेशनपेक्षा खूप वेगळं आहे. या स्टेशनवर बाहेरून कुणी प्रवाशी येऊ शकत नाही आणि रेल्वेतून उतरून बाहेरही जाऊ शकत नाहीत. म्हणजे स्टेशनवर पोहोचण्याचं आणि तिथून जाण्याचं एकमेव साधन रेल्वेच आहे. म्हणजे या स्टेशनवर लोक रेल्वेतून उतरतात, काही वेळ प्लॅटफॉर्मवर घालवतात आणि मग त्याच रेल्वेने पुन्हा पुढचा प्रवास करतात. स्टेशनवर तिकीट काउंटर, गेट किंवा बाहेर जाण्याचा रस्ता नाही. या स्टेशनबाबत कुणालाही प्रश्न पडू शकतात. पण यामागे एक खास कारण आहे.

कुठे आहे हे स्टेशन

हे अनोखं रेल्वे स्टेशन भारतात नाही तर जपानमध्ये आहे. दक्षिण जपानमध्ये निशिकिगावा शिरयू लाइनवर हे अनोखं स्टेशन आहे. आपलं खास डिझाइन आणि नियमांसाठी हे स्टेशन जगभरात प्रसिद्ध आहे. स्टेशनचं नाव शिरयू - मिहार्शी स्टेशन आहे. खास बाब ही आहे की, इथे केवळ एक प्लॅटफॉर्म बनवण्यात आला आहे. ना स्टेशनची कोणती इमारत आहे, ना बाहेर पडण्याचा रस्ता आहे. हे स्टेशन प्रवाशांना एक खास अनुभव देण्यासाठी बनवण्यात आलंय. जपान आधीच आपल्या वेगळ्या आयडियासाठी ओळखला जातो आणि हे स्टेशन त्याचच उदाहरण आहे.

स्टेशनचा मुख्य उद्देश काय?

शिरयू - मिहार्शी स्टेशन काही रेग्युलर वापरासाठी बनण्यात आलेलं नाही. हे स्टेशन निशिकी नदीवर बनवण्यात आलंय. याच्या एकुलत्या एका प्लॅटफॉर्महून नदी, आजूबाजूचं जंगल आणि नैसर्गिक सौंदर्याचा अलौकिक नजारा दिसतो. या स्टेशनचा उद्देश प्रवाशांना काही वेळासाठी निसर्गाच्या जवळ नेण्याचा आहे. इथे रेल्वे १० मिनिटांसाठी थांबते. यादरम्यान प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरून नदी आणि जंगलाचा शांत नजारा अनुभवतात. फोटो काढतात आणि पुन्हा रेल्वेत बसून पुढचा प्रवास सुरू ठेवतात. हेच कारण आहे की, स्टेशनला बाहेर पडण्यासाठी गेट नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Unique Japanese Railway Station: No Entry, No Exit, Just Nature

Web Summary : Japan's Shiryu-Miharashi Station has no entry or exit. Passengers briefly enjoy nature views from the platform before continuing their journey. It offers a unique experience.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके