Railway Interesting Facts : भारतीय रेल्वेबाबत इतक्या इंटरेस्टींग गोष्टी आहेत ना की त्यातील कितीतरी आपल्याला माहितीच नसतात. अनेकदा रेल्वेने प्रवास करून सुद्धा आपल्याला या गोष्टी माहीत नसतात. या सगळ्यात गोष्टी आपल्याला नॉलेजसाठी किंवा महत्वाच्या म्हणून माहिती असायला हव्यात. रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X का लिहिलेला असतो, किंवा रेल्वेच्या इंजिनात टॉयलेट का नसतं? पीएनआरचा फुल फॉर्म काय असतो? अशा कितीतरी गोष्टींचं रहस्य आम्ही आधी उलगडलेलं आहे.
आता आज आपण रेल्वेबाबत एक वेगळी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला माहीत आहेच की, गाडी म्हटली गिअर आला. म्हणजे टू-व्हीलर असो वा फोर व्हीलर किंवा थ्री व्हीलर सगळ्यांमध्ये गिअर सिस्टीम असतेच असते. पण मग रेल्वेतही गिअर सिस्टीम असते का? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
रेल्वेत गिअर सिस्टीम असते का?
तर रेल्वेच्या डीझेल इंजिनात गिअर नाही तर नॉच सिस्टीम असते. रेल्वेत स्पीड कंट्रोल करण्यासाठी नॉचचा वापर केला जातो, हा नॉच डीझल-इलेक्ट्रिक सिस्टीममध्ये ट्रॅक्शन मोटारमध्ये वीज कंट्रोल करतो. याने RPM बदलतो आणि रेल्वेचा स्पीड वाढतो आणि कमी होतो. महत्वाची बाब म्हणजे डीझल इंजिनमध्ये ८ नॉच असतात. आणि सगळे एकदाच सेट केले जातात. ते पुन्हा पुन्हा बदलण्याची गरज पडत नाही.
आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर कारमध्ये गिअरने स्पीड कंट्रोल केला जातो, पण रेल्वेत इंजिन आणि चाकांमध्ये थेट गिअर बदलण्याऐवजी वीज कमी जास्त करून रेल्वेचा स्पी बदलला जातो आणि त्यालाच नॉच म्हटलं जातं. हे नॉच गिअरसारखेच काम करतात.
रेल्वेच्या इंजिनात टॉयलेट का नसतं?
काही रिपोर्ट्सनुसार, इंजिनामध्ये लोको पायलटला बसण्यासाठी केवळ एक सीट असते. रेल्वेच्या इंजिनात टॉयलेट नसतं कारण इंजिनात जागेची कमतरता असते. इंजिन केवळ टेक्निकल उपकरणे आणि कंट्रोल पॅनलने भरलेलं असतं. तसेच सुरक्षेच्या कारणांनी सुद्धा इंजिनात टॉयलेट असणं शक्य नाही. इंजिन फारच संवेदनशील असतं आणि टॉयलेटसारखी व्यवस्था सुरक्षेसाठी धोका ठरू शकते. त्यामुळे यात केवळ आवश्यक उपकरणेच असतात.
मग कसं मॅनेज करतात लोको पायलट?
आधी हे जाणून घ्या की, भारतीय रेल्वे आता काही रेल्वेंच्या इंजिनांमध्ये छोटे पोर्टेबल किंवा वॉटर-लेस टॉयलेट लावण्याचा विचार करत आहे. जेणेकरून लोको पायलटची सोय व्हावी. पण सध्या तर लोको पायलट टॉयलेटला जाण्यासाठी पुढील स्टेशन येण्याची वाट बघत असतात. किंवा मग पोर्टेबल सुविधांचा आधार घेतात. त्यांना पुढील स्टेशनवर टॉयलेटला जाण्याचा वेळ मिळतो. स्टेशनवर लोको पायलटसाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था केलेली असते.