शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या AC कोचच्या सीटवर एक्स्ट्रा कव्हर का लावलेलं असतं? पाहिलं तर असेल पण माहीत नसेल कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:45 IST

Railway Facts : आपणही कधी एसी कोचमधून प्रवास केल्यावर पाहिलं असेल की, एसी कोचमधील सीटवर सीटच्या कव्हरच्या रंगाची एक एक्स्ट्रा चादर टाकलेली असते. पण का?

Railway Facts : रेल्वेने प्रवास करताना वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर येतात. भारतीय रेल्वेकडून करण्यात आलेल्या अनेक बदल तर दिसतातच, सोबतच अशा काही गोष्टी दिसतात ज्यामुळे आपल्या मनात काही प्रश्न निर्माण होतात. रेल्वे जनरल, स्लीपर आणि एसीचे देखील वेगवेगळे कोच असतात. ज्यांमध्ये अनेक नवीन बदल केले गेले. रेल्वेच्या एसी कोचमधील अशीच एक गोष्ट आहे ज्याबाबत काहींना प्रश्न पडतो. अनेकांनी ही गोष्ट नोटीस केली असेल, पण त्यांना त्याचं कारण माहीत नसेल. आपणही कधी एसी कोचमधून प्रवास केल्यावर पाहिलं असेल की, एसी कोचमधील सीटवर तिच्या कव्हरच्या रंगाची एक एक्स्ट्रा चादर टाकलेली असते. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की, एसी कोचमधील सीट्सवर त्यांच्या कव्हरच्या रंगाची एक्स्ट्रा चादर का टाकलेली असते.

खरंतर याबाबत रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर r/indianrailways नावाच्या हँडलवरून एक प्रश्न शेअर करण्यात आलाय. फोटोत एक यूजर फ्लॅपला वर उचलतो, जो अर्धा शिवलेला आहे. त्यात आत बोटं जातील इतकी जागाही सोडण्यात आलीये. रेडिटच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मी बऱ्याच दिवसांनी रेल्वेने प्रवास करत आहे आणि विचार करत आहे की, सीटवर एक्स्ट्रा चादर का दिली गेली आहे. सामान्यपणे अशा गोष्टींचा काहीना काही उद्देश असतो, पण अनेकदा लोकांना याबाबत माहीत नसतं".

सीटवर का असते एक्स्ट्रा चादर?

ज्या कव्हरसारख्या चादरीबाबत आम्ही बोलत आहोत, ती एसी कोटमध्ये असलेल्या बेडशीट सीटवर टिकून रहाव्या म्हणून दिली जाते. एसी कोचमध्ये प्रवाशांना दोन चादरी आणि एक ब्लँकेट दिलं जातं. एक चादर सीटवर टाकली जाते आणि चादरीचे कोपरे फ्लॅपमध्ये दाबले जातात, जेणेकरून रात्री झोपेत चादर इकडे-तिकडे सरकू नये.

काय म्हणाले यूजर्स?

या पोस्टवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बरेच लोक हेच म्हणाले की, त्यांनीही कधी या फ्लॅपच्या उद्देशाचा विचार केला नाही. एका यूजरने लिहिलं की, त्यांनी त्यांच्या मागच्या प्रवासावेळी फक्त चादर फ्लॅपवर पसरवली आणि चादर पुन्हा पुन्हा घसरत राहिली. दुसरे यूजर म्हणाले की, त्यांनी सुद्धा या फ्लॅपच्या उद्देशाकडे लक्ष दिलं नाही आणि याच कारणाने त्यांची सीटवर टाकलेली चादर एकाजागी टिकली नाही. इतरांची चादर बरोबर जागेवर होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Reason for extra seat covers in train AC coaches revealed.

Web Summary : Extra seat covers in AC coaches keep bedsheets in place, preventing them from slipping during sleep. Users on Reddit discussed the purpose of the flaps that secure the sheets.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके