शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

हा तर बॉलीवुड फॅन! परिक्षेत विचारलं चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण? चिमुकल्याने उत्तर दिलं, बाहुबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 16:21 IST

परिक्षेच्या पेपरात काहीही सुचत नसल्यास बॉलीवुडची गाणी लिहुन येणारेही महाभाग काही कमी नसतात. एका चिमुकल्याने परिक्षेत एका प्रश्नाचं उत्तर म्हणून एका हिंदी सिनेमाचं नाव लिहिलं. आणि अहो आश्चर्यम! ते उत्तर बरोबरही आलं. शिक्षकाने त्या उत्तराचे त्याला गुणंही दिले..

तुम्ही शाळेत असताना परिक्षेत केव्हाना केव्हा नक्कीच चुकीचे उत्तर लिहिले असेल. त्याचे मार्क म्हणून तुम्हाला भोपळाही मिळाला असेल. परिक्षेच्या पेपरात काहीही सुचत नसल्यास बॉलीवुडची गाणी लिहुन येणारेही महाभाग काही कमी नसतात. एका चिमुकल्याने परिक्षेत एका प्रश्नाचं उत्तर म्हणून एका हिंदी सिनेमाचं नाव लिहिलं. आणि अहो आश्चर्यम! ते उत्तर बरोबरही आलं. उलट शिक्षकाने त्या उत्तराचे त्याला अधिक गुण दिले..

सध्या सोशल मिडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. फोटो जरी जुना असला तरी त्यामुळे उमटणार तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य अगदी ताजतवानं असेल. प्रश्न पत्रिकेत प्रश्न विचारला होता, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण होता? त्यावर ती प्रश्नपत्रिका सोडवणाऱ्या चिमुकल्याने उत्तर दिलंय बाहुबली!

बरं या प्रश्नाचं उत्तर बाहुबली दिलंय यावरच हा जोक संपत नाही बरं का! त्या लहानमुलाच्या बुद्धीचे तुम्ही कौतुकच कराल. त्या प्रश्नाच्या उत्तराची त्याने फोड केलीय ती अशी, बाहु (arm) बली (strong). त्यावर त्या शिक्षकाने त्याला ५ गुणांपैकी १० गुण दिले आहेत आणि बाजूला शेरा लिहिलाय लॉजिक साठी (for logic). त्या मुलानं प्रश्नाचं अर्ध उत्तर दिलंय. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारी व्यक्ती आहे, नील आर्मस्ट्राँग neil armstrong त्यातलं arm म्हणजे बाहु आणि strong म्हणजे बली. चक्रावलात ना? आता पोटभर हसा. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके