80 Year Old Family Treasure: एखाद्या गुहेत, एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या किल्ल्यात अशा वेगवेगळ्या ठिकाणी खूप वर्षांआधी लपवण्यात आलेल्या खजिन्यांबाबत नेहमीच चर्चा होत असते. लोकांना सुद्धा अशा गोष्टी जाणून घेण्यात फारच रस असतो. अनेक सिनेमांमध्ये आपण पाहत असतो की, आजोबा-पजोबांनी त्यांनी लपवलेल्या खजिन्याची माहिती कशात तरी लपवून ठेवलेली असते किंवा एखादा नकाशा बनवलेला असतो. ज्याद्वारे नंतर नातू - पणतू तो खजिना शोधतात. अशीच एक खरी घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. युद्ध सुरू झालं होतं, अशात एका व्यक्तीने आपल्याकडील सोनं, चांदी, मौल्यवान वस्तू जमिनीखाली गाडून ठेवल्या. जेव्हा अनेक वर्षांनी एका नकाशावर विश्वास ठेवून खोदकाम केलं गेलं तर या व्यक्तीच्या नातवाचं नशीबच चमकलं.
युद्धाची भीती आणि खजिन्याची विल्हेवाट
दुसऱ्या महायुद्धावेळी स्थिती फारच गंभीर आणि गोंधळाची होती. १९३९ सालात सोव्हिएत सेनेचा वाढता धोका पाहता जान ग्लाजेव्स्कीचे आजोबा अॅडम ग्लाजेव्स्कीला आपलं घर-दार सोडून पळावं लागलं. त्यांना भीती होती की, त्यांच्या हवेलीतील किंमती वस्तू लुटल्या जातील. याच भीतीने त्यांनी सोन्या-चांदीची नाणी आणि दागिने जमिनीत गाडून ठेवले. त्यांनी विचार केला होतो की, स्थिती सामान्य झाल्यावर या गोष्टी परत मिळवता येतील. पण युद्धाने सगळं काही बदलून टाकलं. परिवाराची ताटातूट झाली, हवेलीची तोडफोड झाली आणि खजिना जमिनीखाली तसाच राहिला.
एक नकाशा आणि खजिना सापडला
युद्धानंतर अॅडम ग्लाजेव्स्की त्या ठिकाणी कधी परत जाऊ शकले नाहीत. पण त्यांनी त्यांचा मुलगा गुस्तावला खजिन्याबाबत संकेत दिले होते. याच काही आठवणी आणि खूणांच्या मदतीने गुस्तावने हाताने एक नकाशा तयार केला. हा नकाशा त्यांच्यासाठी केवळ कागदाचा एक तुकडा नव्हता, तर परिवाराची आशा होता. गुस्तावने हा नकाशा जीवनभर सांभाळून ठेवला आणि आपला मुलगा जान याला याचं महत्व सांगितलं. जसजसा काळ पुढे गेला लोक या कहाणीला विसरले, पण नकाशा सुरक्षित होता. शेवटी ६९ वयात जान ग्लाजेव्स्कीने या नकाशावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला.
खोदकाम केलं आणि...
जेव्हा जानने नकाशात देण्यात आलेल्या जागेवर खोदकाम केलं तर तेव्हा सुरूवातीला नजारा वेगळाच होता. पण जसजसा खट्टा खोल होत गेला, चमकत्या वस्तूंनी ही कहाणी खरी ठरवली. जमिनीखाली सोन्याची जुनी नाणी, चांदीची भांडी आणि किंमती वस्तू दिसल्या. ही नाणी १९ व्या आणि २०व्या शतकातील असल्याचं सांगितलं जात आहे. आता त्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो डॉलर असल्याचं बोललं जात आहे. या खजिन्याचा शोध केवळ आर्थिक रूपाने मोठा नाही तर भावनिक दृष्टीने देखील खास आहे. हा खजिना हे दर्शवतो की. युद्धाच्या जखमा आणि परिवाराच्या गोष्टी अनेक वर्ष जिवंत राहतात. फक्त योग्य वेळ आणि विश्वासाची गरज असते.
Web Summary : During WWII, a man buried valuables fearing theft. Decades later, his grandson, guided by a map, discovered gold, silver, and coins worth millions, revealing a family's hidden history and fortune.
Web Summary : द्वितीय विश्व युद्ध के दौरान, एक व्यक्ति ने चोरी के डर से कीमती सामान दफना दिया। दशकों बाद, उसके पोते ने एक नक्शे के सहारे लाखों के सोने, चांदी के सिक्के खोजे, जिससे परिवार का गुप्त इतिहास और भाग्य उजागर हुआ।