एक असं टूरिस्ट डेस्टिनेशन जिथे न्यूड होऊन फिरतात लोक, कशाचीही नसते बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:34 AM2024-04-23T10:34:03+5:302024-04-23T10:34:17+5:30

आज आम्ही जगातील न्यूडेस्ट सिटीबाबत सांगणार आहोत. हे जगातील असं एकमेव शहर मानलं जातं. जिथे लोक न्यूड टूरिज़्मसाठी जातात.

Place in the world where it is prohibited to go wearing clothes | एक असं टूरिस्ट डेस्टिनेशन जिथे न्यूड होऊन फिरतात लोक, कशाचीही नसते बंदी!

एक असं टूरिस्ट डेस्टिनेशन जिथे न्यूड होऊन फिरतात लोक, कशाचीही नसते बंदी!

जगभरात अशा अनेक गोष्टी असतात ज्या नेहमीच आश्चर्यचकित करतात. तर काही संस्कृती अवाक् करणाऱ्या असतात. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या संस्कृती बघायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कल्चरबाबत सांगणार आहोत. कदाचित तुम्हाला वाचून धक्काही बसेल. आज आम्ही जगातील न्यूडेस्ट सिटीबाबत सांगणार आहोत. हे जगातील असं एकमेव शहर मानलं जातं. जिथे लोक न्यूड टूरिज़्मसाठी जातात.

आम्ही ज्या शहराबाबत तुम्हाला सांगणार आहोत त्याचं नाव आहे Cap D’Adge. हे एक फ्रेंच शहर आहे. जे Mediterranean कोस्टजवळ आहे. हे शहर आपल्या अनोख्या लाइफस्टाईलसाठी ओळखलं जातं. हे जगातील एक असं ठिकाण आहे जिथे तुमच्यावर कोणतीही बंदी घातली जात नाही. हे शहर जगातील सगळ्यात फेमस हनीमून डेस्टिनेशनपैकी एक आहे.

कपड्यांशिवाय फिरतात लोक

या शहरात लोकांना कपड्यांविना फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. येथील सुंदर समुद्र किनाऱ्यांचा नजाराही फारच वेगळा असतो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, बीचशिवाय लोक रेस्टोरेंट आणि सुपरमार्केटमध्येही कपड्यांशिवाय फिरू शकतात. सलूनमध्ये जायचं असेल, एक्सरसाइज करायची असेल तरीही कपडे घालण्याची काही बळजबरी नाही.

दरवर्षी Cap D’Adge शहरात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. एका अंदाजानुसार, इथे दरवर्षी 50 हजार पर्यटक येतात. इथे जास्तकरून फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, इटली, अमेरिका, डेनमार्क आणि कॅनाडाहून लोक येतात. 

Web Title: Place in the world where it is prohibited to go wearing clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.