PHOTOS: गोपाला गडी या रे या..! गोव्यात चिखलकाला उत्सव
By Admin | Updated: July 6, 2017 23:14 IST2017-07-06T23:11:05+5:302017-07-06T23:14:46+5:30
गोव्यातील माशेल गावात दरवर्षी चिखलकाला साजरा करतात. देव-देवतांचा परिसर म्हणून माशेल गाव ओळखले जाते. गावातील देवकीकृष्ण

PHOTOS: गोपाला गडी या रे या..! गोव्यात चिखलकाला उत्सव
ऑनलाइन लोकमत
गोवा, दि. 06 - गोव्यातील माशेल गावात दरवर्षी चिखलकाला साजरा करतात. देव-देवतांचा परिसर म्हणून माशेल गाव ओळखले जाते. गावातील देवकीकृष्ण मंदिराजवळ हा चिखलकाला साजरा करण्यासाठी सकाळी लोक एकत्र येतात. या मंदिरात देवाला गाऱ्हाणे घालतात आणि या मजेशीर खेळाला प्रारंभ होतो. श्रीकृष्णाच्या जन्माशी, जीवनाशी संबंधित संदर्भ या चिखलकाला खेळाशी आहेत. जमलेले लोक आसपासच्या दुकानात जातात आणि अंगाला तेल चोपतात. दुकानदारही त्यांना आनंदाने तेल देतात आणि मग भाविक चिखलकाल्यात मनसोक्त खेळ खेळतात. यानिमित्ताने भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरात होतात. चिखलकाल्याचा समारोप दहीहंडीने होतो. पाऊस नसेल तर टँकरने पाणी आणून हा आनंद साजरा केला जातो. यंदा टँकर मागवला होता. गोपाला गडी या रे या...गाणे गायले जाते.
(सर्व छाया : गणेश शेटकर, पणजी )