शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीही खिशात मोबाइल ठेवता? एक व्यक्ती मरता मरता वाचला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 12:32 IST

Phone Battery Explodes in Pocket : अनेकदा याबाबत इशाराही दिला जातो की, मोबाइलबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. पण तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि हे त्यांच्या जीवासाठी घातक ठरतं.

Phone Battery Explodes in Pocket : आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी असतात ज्यांच्यामुळे आपल्याला होणारा धोका माहीत नसतो. सामान्यपणे अशा गोष्टींकडे लोक दुर्लक्ष करतात. अनेकदा याबाबत इशाराही दिला जातो की, मोबाइलबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. पण तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि हे त्यांच्या जीवासाठी घातक ठरतं.

असंच काहीसं ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत झालं. त्याने त्याच्या पॅंटच्या खिशात मोबाइल ठेवला होता. पण अचानक त्याच्या पॅंटच्या खिशात मोबाइलची बॅटरी फुटली आणि तो थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, व्यक्तीने आपल्या अनुभवाबाबत सांगितलं की, त्याला वाटलं होतं की, तो आता जिवंत राहणार नाही.

ए करंट अफेयरच्या सॅमसोबत बोलताना एअर कंडिशनिंग इंस्टॉलर मॅथ्यूने सांगितलं की, हा अनुभव असा होता जसे की, कुणीतरी आयरन केटली गरम करून माझ्या गुडघ्यावर ठेवली. हे सगळं तेव्हा झालं जेव्हा मॅथ्यू पॉवर बॅंकने चार्ज होत असलेला फोन आपल्या खिशात ठेवून पायऱ्या चढत होता. यादरम्यान एक आवाज आला आणि आग त्याच्या चेहऱ्याजवळ येत होती. जेव्हा त्याने खाली पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं की, धोका मोठा आहे.

त्याने सांगितलं की, त्याला वाटलं तो आता मरणार. तो जिवंत जाळला जाणार. कसातरी तो त्याच्या जवळच्या रेस्टॉरंटमध्ये गाडी चालवत गेला आणि तिथे एक कॅब बोलवली जेणेकरून हॉस्पिटलला जाऊ शकेल. आधी टॅक्सीवाल्याने त्याला नकार दिला. पण कसातरी तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि त्याच्यावर उपचार सुरू झाले. 

नेहमीच मोबाइलची बॅटरी फुटल्याच्या घटना समोर येत असतात. अशा घटना लीथियम इयॉनच्या बॅटरीमुळे होतात. ज्या फोन, पावरबॅंक, ई-स्कूटर आणि ई-बाइक्समध्ये वापरल्या जातात. ओवरचार्ज झाल्याने अशा घटना जास्त होतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealthआरोग्य