आई-वडील, नवरा-बायको अन् मुलेही मिळतात रेंटवर

By Admin | Updated: March 24, 2017 00:51 IST2017-03-24T00:51:11+5:302017-03-24T00:51:11+5:30

घर, गाडी किंवा इतर साहित्याप्रमाणे आई-वडील, बायको आणि मुले रेंटवर म्हणजे किरायाने मिळतात, असे म्हटले तर तुमचा विश्वास बसणार नाही.

Parents, husband and wife and sons are also available | आई-वडील, नवरा-बायको अन् मुलेही मिळतात रेंटवर

आई-वडील, नवरा-बायको अन् मुलेही मिळतात रेंटवर

टोकियो : घर, गाडी किंवा इतर साहित्याप्रमाणे आई-वडील, बायको आणि मुले रेंटवर म्हणजे किरायाने मिळतात, असे म्हटले तर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु, जपानमधील एका वेबसाईटने नागरिकांसाठी हे शक्य करून दाखवले आहे.
रेंटअवाईफओट्टावा डॉट कॉम या संकेतस्थळावर आई-वडील, बायको आणि मुलांसह अगदी अंर्तवस्त्रेही रेंटने मिळतात. ही वेबसाईट वेगाने लोकप्रिय होत असून ग्राहकांना या सुविधा देण्याच्या मोबदल्यात साइटला मोठी कमाई होत आहे. तुम्ही जर एकटे असाल तर ही वेबसाइट तुम्हाला तुमच्या इच्छेनुरुप पुरूष किंवा स्त्री मित्र उपलब्ध करून देते. या वेबसाइटवर तुम्हाला प्रेम करणारे आई्-वडील आणि अगदी बायकोही रेंटने मिळते. ही एकमेव अशी वेबसाइट आहे जेथे अंर्तवस्त्रेही भाड्याने मिळतात. तुम्ही तुम्हाला आलेला कंटाळा घालविण्यासाठी या वेबसाइटकडून मुलेही किरायाने घेऊ शकता.
जर तुमच्याकडे वेळ नाही आणि मुलांचा गृहपाठ अधिक असेल तर ही वेबसाइट तुम्हाला गृहपाठ करून घेणारी व्यक्तीही रेंटवर उपलब्ध करून देते.

Web Title: Parents, husband and wife and sons are also available