शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: पब मध्ये घडली भुताटकी! घटनेचा शॉकिंग व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये झाला कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 17:51 IST

ब्रिटेनमधील एका रेस्टॉरंटमध्ये विचित्र प्रकार समोर आल्यानंतर मालकांनाही धक्का बसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गोष्टीचा खुलासा झाला आहे.

ब्रिटेनमधील एका रेस्टॉरंटमध्ये विचित्र प्रकार समोर आल्यानंतर मालकांनाही धक्का बसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गोष्टीचा खुलासा झाला आहे. व्हिडीओमध्ये (Shocking Video) दिसून येत आहे की, एक महिला पबच्या आत आपल्या हातात चमचा घेऊन बराच वेळ पाहत होती. यादरम्यान स्टाफ मेंबरदेखील तेथे उभा होता. मात्र चमचा हातात ठेवलेला असताना अचानक तो हातातच गोल फिरला आणि खाली पडला. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डार्लिंगटनच्या मोरपेथमधील 'द ब्लॅक एंड ग्रे' पब सांभाळणाऱ्या बहिणी रिचेल स्टॉक्स आणि एशले नाइस्बिट यांनी आपल्या रेस्टॉरंटमध्ये विचित्र गोष्टी पाहिल्यानंतर पोलिसांना फोन केला. पबमध्ये विचित्र घटना घडत होत्या. त्यापैकी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिलेच्या तळहातावरील चमचा जागेवरच फिरल्याचं पाहिलं जात आहे. (woman did such a dangerous thing sitting in the pub the waiter ran away Incident captured on CCTV)

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या पबमधील स्टाफ मेंबर आता येथे एकटे असताना काम करण्यास घाबरतो. सप्टेंबर 2021 मध्ये दोघी बहिणी पबमध्ये वर बसल्या होत्या. यावेळी त्यांना खाली काहीतरी जोरात आदळल्याचा आवाज आला. पोलिसांना यावेळी कोणतेही पुरावे मिळाले नाही. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना माणसाची छाया दिसली, जे पाहून त्यांना धक्काच बसला.

रिचेलने सांगितलं की, आम्ही पबच्या वरच्या अपार्टमेंटमध्ये राहतो. त्या दिवशी रात्री काहीतरी भयंकर आवाज येत होते. जमिनीवर काहीतरी आदळल्याचा आवाज होता. मात्र जेव्हा पोलीस पबमध्ये गेले तर त्यांना काहीच दिसलं नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र एक माणसाची छाया दिसली.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके