शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी बोलण्यात पाकिस्तानी लोक भारताच्या ६ पट पुढे... अभ्यासातून समोर आलं अनपेक्षित सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 18:07 IST

'फाडफाड इंग्रजी बोलणं हे श्रीमंत देशाचं लक्षण मूळीच नाही', हे सांगणारा हा अहवाल एकदा नजरेखालून घालाच

Intresting Facts : जगभरात इंग्रजी भाषिकांची संख्या अगणित आहे. बऱ्याच वेळा असं मानलं जातं की ज्या देशातील लोक फाडफाड इंग्रजी बोलतात, तो देश झटपट विकसित होतो आणि इंग्रजी बोलता येणं हे एखाद्या देशाला महासत्ता बनवण्यात फायदेशीर ठरते. पण ही समजूत अतिशय चुकीची असल्याचे नुकतंच एका अभ्यासातून समोर आले आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे देशातील दुसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता मानल्या जाणाऱ्या चीनमध्ये केवळ 0.5 टक्के लोकांनाच इंग्रजी बोलता येतं. तसेच, सध्या आर्थिक दिवळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानमध्ये हा टक्का भारतापेक्षा ६ पटीने जास्त आहे.

भारतात प्रामुख्याने भाषेच्या संदर्भात लोकांचा असा समज आहे की, इंग्रजी ही भाषा केवळ व्यापार करण्यासाठी, हिंदी व्यवहारासाठी तर मातृभाषेचा उपयोग भाषिक संस्कारासाठी केला गेला पाहिजे. केवळ इंग्रजी भाषेला यशाची गुरुकिल्ली समजणाऱ्यांसाठी हे गंमतीदार तथ्य त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेमध्ये देखील लोक अपेक्षित प्रमाणात इंग्रजी बोलत नाहीत. अशीच काहीशी स्थिती इंग्रजीचे उगमस्थान असलेल्या इंग्लंडमध्ये आहे. यूकेमध्ये देखील इंग्रजी भाषिकांचे प्रमाण तुलनेने खूप कमी आहेत.

चीनमध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांचा टक्का सर्वात कमी- जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांचा आकडा सर्वात कमी आहे. आर्थिक तंगीत सापडलेल्या पाकिस्तानचे लोक हे झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारतीयांपेक्षा चांगलं इंग्रजी बोलतात असे अभ्यासात समोर आले आहे. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे, बारबोडोस आणि जिब्राल्टर यांसारखे क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोट्या असणाऱ्या देशांमध्ये इंग्रजी भाषिकांचे प्रमाण हे  १०० टक्के आहे.

क्रिस्टल, यूरोबॅरोमीटर, अमेरिकी जनगणना ब्यूरो, मिक्रोजेंसस, ब्रिटीश काउंसिल आणि इफ जनगणना यांच्यानुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 10.5 लोकांना चांगले इंग्रजी बोलता येते. याउलट भारताच्या शेजारील राष्ट्र असलेल्या बांगलादेशमध्ये 12 % लोक उत्तम इंग्रजी बोलतात. या सर्व देशांच्या तुलनेत पाकिस्तान हा बांगलादेश आणि भारताच्या खूप पुढे आहे. पाकिस्तानातील 49% ते 58% लोक उत्तम इंग्रजी बोलतात असा निष्कर्ष अभ्यासात पुढे आला आहे.

चला तर मग जाणून घेऊया लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक इंग्रजी बोलणाऱ्या देशांची टक्केवारी:

चीन -0.5%ब्राजील-5%रूस-5%अर्जेंटीना-6.52%भारत-10.5%बांग्लादेश-12%मेक्सिको-12.9%तुर्की-17%स्पेन-22%दक्षिण आफ्रिका-31%इटली-34%पाकिस्तान-49-58%ग्रीस-51%नाइजिरीया-53-60%जर्मनी-56%फ्रांस-57%फिलीपींस-58%बेल्जिअम-60%ऑस्ट्रिया-73%फिनलॅंड-75%कनाडा-83%डेनमार्क-86%स्वीडन-89%नॉर्वे-90%ऑस्ट्रेलिया-92.8%यूएसए-95.5%सिंगापूर-96.43%न्यूजीलंड-97.82%यूके-98.3%आयरलॅंड-98.37%बारबाडोस-100%जिब्राल्टर-100%

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके