शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सौंदर्यामुळे चर्चेत असते ही जोडी, कोण आई-कोण मुलगी ओळखणेही कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 18:12 IST

मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धांप्रमाणे विवाहित महिलांसाठी मिसेस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात येते.

ठळक मुद्देवयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी रश्मी सचदेव यांचा दिल्लीच्या मनोज सचदेव यांच्याबरोबर विवाह झाला. मनोज पेशाने चार्टर्ड अकाऊंटट आहेत, लग्न झाले तेव्हा रश्मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला होत्या. 

जयपूर - मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धांप्रमाणे विवाहित महिलांसाठी मिसेस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात येते. मंगळवारी मिसेस युनिव्हर्स युरो एशियाचा किताब जिंकणा-या रश्मी सचदेव जयपूर शहरात आल्या होत्या. रश्मी यांना एक मुलगी सुद्धा आहे. रश्मी यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणालाही त्यांच्या वयाचा अंदाज येत नाही. त्यामुळे त्या एका मुलीच्या आई आहे हे सुद्धा कोणाला खरे वाटणार नाही. 

रश्मी आणि त्यांची मुलगी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. दोघींना एकत्र पाहिल्यानंतर कोण आई आणि कोण मुलगी असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही ? दोघींचे सौदर्य पाहणा-याल चकीत करुन सोडते. मुलीच्याच सांगण्यावरुन रश्मी यांनी मॉडलिंगची करीयर म्हणून निवड केली आणि आज त्या या टप्प्याला पोहोचल्या आहेत.  

जाणून घ्या रश्मी यांच्याबद्दल काही खास गोष्टी 

- वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी रश्मी सचदेव यांचा दिल्लीच्या मनोज सचदेव यांच्याबरोबर विवाह झाला. मनोज पेशाने चार्टर्ड अकाऊंटट आहेत. लग्न झाले तेव्हा रश्मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला होत्या. 

- 13 सप्टेंबर 1995 साली रश्मी यांनी एका सुंदर मुलीला जन्म दिला. अस्का असे त्यांच्या मुलीचे नाव आहे. मुलीचा सांभाळ करत त्यांनी ग्रॅज्युएशन आणि इंटीरियर डिझायनिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. 

- मुलगी अस्का 22 वर्षांची असून दिल्ली विद्यापीठात इंग्लिश ऑनर्सचे शिक्षण घेत आहे.                                                                             - 2015 साली दिल्लीत मिसेस ब्युटी पेजेंट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये रश्मी यांची मैत्रीण सहभागी झाली होती. त्यावेळी अस्काने आईला सहभागी होण्यास सांगितले. सुरुवातीला रश्मी यांनी नकार दिला. पण मुलगी मागे लागल्यामुळे अखेर त्या स्पर्धेत सहभागी झाल्या व किताबही जिंकला. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक सौदर्य स्पर्धांचे किताब जिंकले. मिसेस इंडिया, मिसेस आशिया इंटरनॅशनल, चीनमध्ये मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत मिसेस युनिव्हर्स गोल्डन हार्टचा किताब त्यांना मिळाला.                                         

टॅग्स :Miss Worldविश्वसुंदरी