शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य! भारतातील असं एकमेव मंदिर जिथे देवी मातेला अर्पण केला जातो 'चपलांचा हार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 14:18 IST

देशात एक असंही मंदिर आहे जिथे देवाला प्रसाद नाही तर चपलांचा हार अर्पण केला जातो. अर्थातच यावर अनेकांना विश्वास बसला नसेल. पण हे सत्य आहे.

हिंदू धर्माच्या मान्यतांनुसार, जेव्हाही आपण मंदिरात जातो तेव्हा देवासाठी प्रसाद आवर्जून नेतो. फूल आणि इतरही काही वस्तू देवाला अर्पण करतो. देशातील वेगवेगळ्या मंदिरात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू देवाला चढवल्या जातात. मंदिरात गेल्यावर गेटच्या बाहेरच चपला काढून ठेवाव्या लागतात. पण देशात एक असंही मंदिर आहे जिथे देवाला प्रसाद नाही तर चपलांचा हार अर्पण केला जातो. अर्थातच यावर अनेकांना विश्वास बसला नसेल. पण हे सत्य आहे. भारतात एक देवीचं असं मंदिर आहे जिथे चपलांचा हार अर्पण केला जातो.

कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यात 'लकम्मा देवी'चं प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी एक जत्रा भरते. यादरम्यान दूरूदुरून भाविक लकम्मा मातेचं दर्शन करण्यासाठी येतात. हे भाविक देवीला चपलांचा हार अर्पण करतात. या फेस्टिव्हलमध्ये मुख्यत्वे गोला नावाच्या गावातील लोक जास्त करून येतात. याला फुटवेअऱ फेस्टिव्हलही म्हटलं जातं. 

यादरम्यान ज्या भक्तांच्या पायात आणि गुडघ्यांमध्ये वेदना असतात ते इथे मोठ्या प्रमाणात चपलांचे हार अर्पण करतात. असे मानले जाते की, असं केल्याने देवी माता त्यांची ही वेदना नेहमीसाठी दूर करते. असेही म्हटले जाते की, या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण होते. (हे पण वाचा : भारतीय नाण्यांवर वर्षाच्या खाली डॉट, स्टार अशी चिन्हे का असतात? जाणून घ्या अर्थ.....)

या मंदिराची जुनी मान्यता आहे की, जर लकम्मा देवीला चपलांचा हार अर्पण केला तर ती याने प्रसन्न होते. आणि वाईट शक्तींपासून भाविकांची सुरक्षा करते. मान्यता अशीही आहे की, देवी माता भाविकांनी अर्पण केलेल्या चपला रात्री घालून फिरते आणि त्यांची रक्षा करते. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेTempleमंदिर