शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन बायकांनी एका पतीची केली अनोखी वाटणी, आठवड्यातील 3 एकीजवळ तर 3 दिवस दुसरीजवळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 10:09 IST

ग्वाल्हेर इथे राहणाऱ्या 28 वर्षीय तरूणीचं 5 वर्षाआधी सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघांना एक मुलगा झाला. 2 वर्ष पती-पत्नीसोबत राहिले. 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं तेव्हा पती पत्नीला तिच्या माहेरी ठेवून गेला.

मध्‍य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एक पती आणि दोन पत्नींमध्ये झालेली डील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हरयाणाच्या गुरुग्राममध्ये नोकर करत असलेला सॉफ्टवेअर इंजिनीअर विवाहित असूनही सोबत काम करणाऱ्या एका तरूणीच्या प्रेमात पडला. अविवाहित असल्याचं सांगत त्याने सोबत काम करणाऱ्या तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. काही महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्याने लग्न केलं. इकडे माहेरी असलेली त्याची पत्नी त्याचा शोध घेत गुरुग्राममध्ये पोहोचली. तेव्हा त्याच्या दुसऱ्या पत्नीबाबत खुलासा झाला. पत्नी ग्वाल्हेरला येऊन फॅमिली कोर्टात केस दाखल करणार होती. पण काउन्सेलर हरीश दिवाण यांनी दोन महिला आणि पतीला बोलवून काउन्सेलिंगच्या माध्यमातून त्यांच्यात एक करार करून दिला.

3-3 दिवसांची वाटणी

पतीने दोन्ही पत्नीला गुरुग्राममध्ये वेगवेगळे फ्लॅट घेऊन दिले. करारानुसार, पती 3 दिवस एका पत्नीकडे आणि 3 दिवस दुसऱ्या पत्नीसोबत राहणार. एक दिवस जेवण पहिल्याकडे करणार तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पत्नीकडे करणार. पती आपला खर्च काढून झाल्यावर उरलेला पगार दोन्ही पत्नींमध्ये समान वाटणार. रविवारी पती त्याच्या मनाचा राजा असेल. दोन्ही पत्नींचा रविवारी पतीवर काही अधिकार राहणार नाही. 

ग्वाल्हेर इथे राहणाऱ्या 28 वर्षीय तरूणीचं 5 वर्षाआधी सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघांना एक मुलगा झाला. 2 वर्ष पती-पत्नीसोबत राहिले. 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं तेव्हा पती पत्नीला तिच्या माहेरी ठेवून गेला. यादरम्यान तो त्याच्यासोबत काम करणाऱ्या तरूणीच्या प्रेमात पडला. स्वत:ला अविवाहित असल्याचं सांगत तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला आणि काही महिन्यांनी त्याने तिच्यासोबत दुसरं लग्न केलं. व्यक्तीला दुसऱ्या पत्नीकडून एक मुलगी झाली. दुसरीकडे लॉकडाऊन संपला तरी घ्यायला आला नाही म्हणून पहिली पत्नी त्याला शोधण्यासाठी आली. तेव्हा तिला त्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत समजलं. दुसऱ्या पत्नीला हे समजल्यावर धक्का बसला. इथे पती आणि दोन पत्नींमध्ये जोरदार भांडण झालं. पहिली पत्नी नाराज होऊन केस करण्यासाठी ग्वाल्हेरमध्ये आली.

पती आणि दोन पत्नींमध्ये अनोखा करार

पहिली पत्नी ग्वाल्हेर फॅमिली कोर्टात पोहोचली आणि आपल्या पती विरोधात केस दाखल करण्याच्या तयारीत होती. या दरम्यान फॅमिली कोर्टाचे काउन्सेलर हरीश दिवाणची भेट तरूणाच्या पहिल्या पत्नीसोबत झाली. हरीश दिवाण यांनी व्यक्तीच्या पहिल्या पत्नीला समजावलं आणि पतीसोबतच राहण्याचा सल्ला दिला. महिलेच्या पतीसोबत चर्चा केली तर तो म्हणाला की, महिलेचं वागणं बरोबर नव्हतं. त्यामुळे त्याने सोबत काम करणाऱ्या तरूणीसोबत लग्न केलं. व्यक्तीने स्पष्ट शब्दात सांगितलं की, तो दुसऱ्या पत्नीला कोणत्याही स्थितीत सोडणार नाही. हरीश दिवाण यांनी त्यांना समजावून सांगितलं की, पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय दुसऱ्या पत्नीला कायदेशीर मान्य मिळणार नाही. पहिली पत्नी केस दाखल करेल आणि अशात त्याची नोकरीही धोक्यात येईल. हे ऐकल्यानंतर पती वेगळा पर्याय निवडण्यासाठी तयार झाला. फोनवरच दुसऱ्या पत्नीला समजावण्यात आलं आणि ती सुद्धा या करारासाठी तयार झाली.

रविवारी पती मनाचा राजा

काउन्सेलर हरीश दिवाणने पती आणि दोन्ही पत्नीमध्ये करार करून दिला. करारानुसार,  पतीने गुरुग्राममध्ये दोन्ही पत्नींना एक-एक फ्लॅट घेऊन दिला. पहिली पत्नी आपल्या मुलासोबत फ्लॅटमध्ये राहणार आणि दुसरी पत्नी आपल्या मुलीसोबत फ्लॅटमध्ये राहणार. 

आठवड्यातील पहिले 3 दिवस तो पहिल्या पत्नीसोबत राहणार आणि बाकीचे 3 दिवस तो दुसऱ्या पत्नीसोबत राहणार. एक दिवस पहिल्या पत्नीच्या घरी जेवण करणार आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पत्नीच्या दिवशी जेवण करणार. इंजिनिअर पती त्याच्या पगारातून त्याचा खर्च काढणार आणि उरलेले पैसे दोन्ही पत्नींमध्ये  समान वाटणार. रविवारी पती एकटा राहणार. रविवारी दोन्ही पत्नींचा पतीवर कोणताही अधिकार किंवा दबाव राहणार नाही.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटकेmarriageलग्न