शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या निधनानंतर 73 वर्षीय व्यक्तीने केलं दुसरं लग्न, लग्नाच्या तीन महिन्यांनंतर झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 17:15 IST

बजाज नगर पोलिसांनी सांगितलं की, 73 वर्षीय रामधनकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.  तक्रारीत रामधनने सांगितलं की, त्याच्या पत्नीचं जून 2021 मध्ये निधन झालं होतं.

Luteri Dulhan: जयपूरच्या बजाज  नगर भागात एका 73 वर्षीय वृद्धानला एका वर्षाआधी पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न करणं चांगलंच महागात पडलं. 62 वर्षीय  पत्नी लग्नाच्या काही दिवसांनंतरच पतीला त्रास देऊ लागली आणि लग्नाच्या तीन महिन्यानंतर घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली. मार्च 2022 मध्ये वृद्ध व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तक्रार दाखल झाली नाही. वृद्ध व्यक्तीने आता कोर्टात केस दाखल केली आहे. वृद्ध व्यक्ती एक रिटायर्ड अधिकारी असून ज्याला दोन मुलं आणि नातवंडे आहेत. 

बजाज नगर पोलिसांनी सांगितलं की, 73 वर्षीय रामधनकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.  तक्रारीत रामधनने सांगितलं की, त्याच्या पत्नीचं जून 2021 मध्ये निधन झालं होतं. यानंतर रामधनने सुमन नावाच्या एका विधवा महिलेसोबत डिसेंबर 2021 मध्ये आर्य समाज मंदिरात दुसरं लग्न केलं. लग्नाच्या 5 दिवसांनंतरच सुमनचा व्यवहार बदलला आणि तिने पतीला ब्लॅकमेल करत घराचा अर्धा हिस्सा तिच्या नावे करण्याची व फ्लॅट खरेदी करून देण्याची मागणी केली. तसेच 20 हजार रूपये प्रति महिला खर्च देण्याचीही मागणी केली. धमकी दिली की, हे असं केलं नाही तर ती त्याच्या विरोधात खोटी केस दाखल करेल. इतकंच नाही तर ती असंही म्हणाली की, असं केलं नाही तर ती जेवणातून त्याला विष देऊन जीवे मारेल.

पीडित व्यक्तीने सांगितलं की, आरोपी महिला घराच्या पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या वृद्ध व्यक्ती सूनेला-नातवंडांनाही पतीसोबत बोलू देत नव्हती. कथितपणे तिने पतीला शिव्याही दिल्या आणि मारहाणही केली. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर मार्च 2022 मध्ये सुमनने पतीसोबत भांडण केलं आणि त्यानंतर घर तिच्या नावावर करण्यास सांगून घरातील पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली. ती 2 लाख रूपये रोख घेऊन फरार झाली.

यानंतर वृद्ध व्यक्तीने सुमनला फोन केला तर सुमनने उलट त्यालाच धमकावणं सुरू केलं. तिने घराचा अर्धा हिस्सा आणि प्लॅटची मागणी केली. याला वैतागून वृद्ध व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली. त्यानंतर पीडितने कोर्टाकडे न्यायाची मागणी केली. आता त्याची तक्रार पोलिसात दाखल झाली. पोलीस सुमनचा शोध घेत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीmarriageलग्नJara hatkeजरा हटके