शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! या पठ्ठ्यानं एक दोन नाही तर तब्बल ९ जणींशी केलं लग्न, एकूण बायका १०, आता सांगितलं यामागचं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 17:46 IST

Jara Hatke News: चांगली नोकरी, घरदार असूनही लग्न ठरत नसल्याची तक्रार अनेक तरुण करतात. मात्र ब्राझीलमधील एका तरुणाने एकाचवेळी ९ जणींशी लग्न करत खळबळ उडवून दिली आहे.

रियो दि जानिरो - चांगली नोकरी, घरदार असूनही लग्न ठरत नसल्याची तक्रार अनेक तरुण करतात. मात्र ब्राझीलमधील एका तरुणाने एकाचवेळी ९ जणींशी लग्न करत खळबळ उडवून दिली आहे. या लग्नाआधी त्याची एक पत्नी होती. त्यामुळे आता एकूण त्याच्या दहा पत्नी आहेत. आर्थर ओ उर्सो असं या तरुणाचं नाव असून, तो मॉडेलिंग करतो.

विवाहित असलेला आर्थर हा लठ्ठपणामुळे त्रस्त होता. त्याचे वजन १०० किलोंच्या वर गेले होते. मात्र त्यापासून मुक्तता मिळवण्याचा निश्चय त्याने केला. तसेच मेहनतीने तब्बल २८ किलो वजन कमी केले. तसेच वजन कमी केल्यानंतर आता त्याने मॉडेलिंग सुरू केले.

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार एकाच वेळी ९ महिलांसोबत विवाह केल्याने तो चर्चेत आला आहे. आर्थर ओ उर्सो याच्या पहिल्या पत्नीचं नाव लुआना काजाकी आहे. आर्थरचं जीवन कसं बदललं, याची कहाणी आता त्याने स्वत:च सर्वांना सांगितली आहे. त्याने सांगितलं की, मी सोमवारपासून शनिवारपर्यंत जिममध्ये घाम गाळत असे. तसेच रविवारी आराम करत असे. आपल्या खाण्या-पिण्याबाबत सांगताना आर्थर म्हणाला की, ज्यामध्ये मीठ, साखर किंवा फॅट असतील असं भोजन मी घेतलं नाही. तसेच संतुलित आहारासाठी काही नियम बनवले.

नव्या जीवनशैलीमुळे आपलं जीवन खूप बदललं, तसेच माझ्या आकर्षक लूककडे महिला आकर्षित होऊ लागल्या, असं तो सांगतो. तत्पूर्वी आर्थर याची पत्नी लुआना हिने ते प्रौढांच्या साईटवरून दरमहा ५० लाख रुपयांची कमाई करतात, असं सांगून खळबळ उडवून दिली होती. ओपन रिलेशनशिपमुळे आर्थर आणि लुआना हे खूप चर्चेमध्ये असतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्नBrazilब्राझील