हवामानाच्या अंदाजाला उत्तुंग इमारतींचा अडथळा

By Admin | Updated: July 4, 2014 08:56 IST2014-07-04T04:36:15+5:302014-07-04T08:56:41+5:30

मुंबईचे अचूक हवामान टिपणाऱ्या डॉप्लर रडारला उत्तुंग इमारतींचा अडथळा येत असल्याचा दावा हवामान खात्याने केला असून, याविरोधात बांधकाम व्यावसायिक उच्च न्यायालयात गेले आहेत.

The obstacle in the buildings of weather estimates | हवामानाच्या अंदाजाला उत्तुंग इमारतींचा अडथळा

हवामानाच्या अंदाजाला उत्तुंग इमारतींचा अडथळा

मुंबई : मुंबईचे अचूक हवामान टिपणाऱ्या डॉप्लर रडारला उत्तुंग इमारतींचा अडथळा येत असल्याचा दावा हवामान खात्याने केला असून, याविरोधात बांधकाम व्यावसायिक उच्च न्यायालयात गेले आहेत.
बांधकाम व्यावसायिकांच्या याचिकेवर न्या़ अनुप मोहता व न्या़ अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ त्यात अ‍ॅडव्होकेट जनरल डी़जे़ खंबाटा यांनीही हे यंत्र चुकीच्या ठिकाणी असल्याचा युक्तिवाद केला़ ते म्हणाले, हवामान खात्याला अंदाज मिळत नाही. म्हणून उत्तुंग इमारती असू नयेत हे चुकीचे आहे़ जगात प्रत्येक अत्याधुनिक शहरात हवामान खात्याचे यंत्र असून उंच इमारतीही आहेत़ हवामान खात्याने हे यंत्र दुसरीकडे हलवावे वा अतिरिक्त यंत्र बसवावे़
महापालिकेचे वकील अनिल साखरे यांनी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले़ हे यंत्र २०१०मध्ये नेव्ही नगरमध्ये बसवण्यात आले़ त्या वेळी या विभागात उंच इमारती होत्याच याकडेही याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले़ त्यावर न्यायालयाने हवामान खात्याला याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले़ मुळात उंच इमारतींचा नेमका अडथळा काय असून संबंधित विभागात उंच इमारती असताना हे यंत्र कसे बसविले? हे यंत्र आता तेथून हलवणार की नाही याचा खुलासा खात्याने करावा, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे़ यावर १४ जुलैला सुनावणी होणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The obstacle in the buildings of weather estimates