अर्थातच ही बातमी तुम्हाला विचित्र वाचू शकते. मात्र ही बातमी खरी आहे. लवकरच तुम्ही तुमच्या मृत नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत आणि अनोळखी लोकांसोबत चॅट करू शकणार आहात. हे वाचून तुमच्या मनात अनके प्रश्न आले असतील. पण पूर्ण बातमी वाचल्यावरच तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.
दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने नुकतंच एका नव्या चॅटबोटचं पेटेंट केलं आहे. कंपनीचा दावा आहे की, या चॅटबोटच्या माध्यमातून तुम्ही मृत लोकांसोबत बोलू शकणार आहात. CNN च्या एका वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टला एका अशा चॅटबोटसाठी पेटेंट दिला गेला आहे जे मृत मित्र, नातेवाईक, अनोळखी आणि सेलिब्रिटीसोबत बोलण्यासाठी सक्षम आहे.
नवं चॅटबोट Black Mirror ने प्रभावित
नवीन चॅटबोट Black Mirror नावाच्या वेबसीरीजने प्रभावित असल्याचं सांगितलं जात आहे. या सीरीजमध्ये असं अॅप दाखवण्यात आलं आहे ज्याच्या मदतीने एक मुलगी तिच्या मृत बॉयफ्रेन्डसोबत संवाद साधते.
हे होणार कसं?
मिळालेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्टच्या चॅटबोटमध्ये मृत लोकांच्या सोशल प्रोफाइलमधून डेटा घेतला जाईल. त्यांच्या डेटाच्या आधारावर चॅटबोट प्रोग्राम केलं जाईल. मेलेल्या लोकांसोबत याच आधारावर संवाद साधला जाईल.
कधी लॉन्च होणार
मृत लोकांसोबत बोलण्याबाबत काही लोक नक्कीच सहमत असतील. पण जगभरातून चॅटबोटवर टिकाही होत आहे. इंटरनेटवर लोक या टेक्निकला disturbing म्हटलं आहे. रिपोर्टनुसार, मायक्रोसॉफ्टने चॅटबोट सध्याच लॉन्च करण्यास नकार दिला आहे. मायक्रोसॉफ्टच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे जीएम Tim O'Brien यांनी ट्विट करून माहिती दिली की, सध्या त्यांच्याकडे चॅटबोट लॉन्च करण्याचा कोणताही प्लॅन नाही.