आता खेऴा फेसबुक मेसेंजरवर बुद्धीबळ
By Admin | Updated: February 5, 2016 18:36 IST2016-02-05T17:59:57+5:302016-02-05T18:36:14+5:30
नेटवर्किंगमध्ये सतत अग्रेसर असणा-या फेसबुकने आता आपल्या फेसबुक मॅसेंजर युजर्ससाठी बुद्धीबऴ खेऴण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे.

आता खेऴा फेसबुक मेसेंजरवर बुद्धीबळ
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - नेटवर्किंगमध्ये सतत अग्रेसर असणा-या फेसबुकने आता आपल्या फेसबुक मेसेंजर युजर्ससाठी बुद्धीबऴ खेऴण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे.
सीनेट डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनवर फेसबुक मेसेंजर अॅप असणा-या सर्व युजर्संना आता बुद्धीबळ खेळता येणार आहे. त्यासाठी युजर्संनी आपल्या फेसबुक मेसेंजरमध्ये “@fbchess play” असे टाईप केल्यास आपल्याला बुद्धीबळ पट उपलब्ध होईल. ज्यावेळी तुम्ही बुद्धीबळ खेऴता त्यावेळी बुद्धीबळातील सोंगट्यांसाठी तुम्हाला “@fbchess Pd3” अशी कमांड द्यावी लागणार आहे. प्रत्येकवेळी तुम्हाला प्यादे किंवा वजीर चालवायचा असेल, तर तुम्हाला त्या-त्या सोंगट्यांची कंमाड द्यावी लागणार आहे. यासाठी के फॉर किंग, क्यू फॉर क्विन, बी फॉर बिशप, एन फॉर नाईट अशा प्रकारे प्रत्येक सोंगटीला कोड देण्यात आला आहे. याचबरोबर हा खेऴ खेऴताना काही अडचण आणि असता तुम्ही “@fbchess help” अशी कमांड दिली की, तुम्हाला याबद्दल अधिक माहिती मिऴेल अशी सोय करण्यात आली आहे.