जगातल्या सर्वात रहस्यमय देशांपैकी एक असलेल्या उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सध्या एका ऑपरेशनच्या अपयशामुळे मृत्यूशी झुंज देत असल्याचा दावा केला जात आहे. किम जोंग उन यांचं खाजगी जीवनही लोकांसाठी रहस्यच आहे. पण काही खास माहिती मोजक्याच लोकांना माहीत आहे. त्यांच्या अनेक गोष्टी लोकांना माहितीच नाहीत. त्यातील एक महत्वाची माहिती म्हणजे त्यांची पत्नी आणि तीन अपत्ये. त्यांनी आपल्या परिवाराला अजूनही लोकांच्या नजरेपासून दूर ठेवलं आहे.
घाईत झालं होतं लग्न
असे सांगितले जाते की, किम जोंग उन यांच्या पत्नीचं नाव री सोल जू आहे. उत्तर कोरियातील मिडियाने 2012 मध्ये सांगितले होते की, किम जोंग उन यांचं लग्न झालं आहे. काही लोकांचा दावा आहे की, 2008 मध्ये किम जोंग उनच्या वडिलांना हृदय विकाराचा झटका आल्यावर 2009 मध्ये त्यांचं लग्न करण्यात आलं होतं. 2010 मध्ये त्यांना पहिलं अपत्य झालं. आता किम जोंग उन यांना तीन अपत्ये आहेत. पण त्यांच्याबाबत जगाला फार माहिती नाही.
अमेरिकन बास्केटबॉल खेळाडूने केला होता दावा
किम जोंग उनच्या परिवाराबाबत सर्वात विश्वसनिय माहिती साऊथ कोरियाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांकडे आहे. इतकेच नाही तर दक्षिण कोरियातील काही नेत्यांनीही त्यांच्या सूत्रांचा हवाला देत हे सांगितले होते की, किम जोंग उन यांनी तान अपत्ये आहेत. अमेरिकेचा माजी बास्केटबॉल खेळाडून डेनिस रोडमॅन याने 2013 मध्ये त्याच्या उत्तर कोरिया दौऱ्यानंतर दावा केला होता की, किम जोंग उन च्या मुलीला त्याने कडेवर घेतलं होतं.
कोण सांभाळणार खुर्ची?
काही विश्लेषकांचं असं मत आहे की, जर काही झालं तर किम जोंग उन यांची लहान बहीण किम यो जोंग आपल्या भाच्याला शासक घोषित करून ती पडद्यामागून सत्ता सांभाळू शकते. किमचा मुलगा आता केवळ 10 वर्षांचा आहे. अशात किम यो जोगंची भूमिका महत्वाची आहे.
असे सांगितले जात आहे की, किम जोंग उन यांच्यावर कार्डिओवस्कुलर समस्येमुळे उपचार सुरू होते. अमेरिकन चॅनल सीएनएनच्या रिपोर्टनुसार, किम जोंगची सर्जरी केली गेली. पण त्यांची स्थिती अधिक बिघडल्याची माहिती आहे.
आणखी वाचा...
कोरोनाच्या संकटात शिवराज सिंहांकडून मंत्रिमंडळ विस्तार; शिंदेंना झुकते माप
किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका
'मी इंजिनिअरिंग सोडून आर्किटेक्ट बनलो, पण...'; रतन टाटांच्या मनावर आजही मोठे ओझे
कच्च्या तेलाची किंमत १ डॉलरपेक्षा खाली गेली खरी; पण भारताला फायदा काय?
'उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल'; उमा भारती संतांच्या हत्येवरून संतापल्या
योगी आदित्यनाथांच्या मावशीला सीमेवर रोखले; जिल्हाधिकाऱ्यांचा पासही होता