नऊशे जावयांना धोंडे जेवण
By Admin | Updated: July 7, 2015 04:03 IST2015-07-07T03:36:40+5:302015-07-07T04:03:02+5:30
ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाला नऊशे जावई-पाहुण्यांनी आपल्या सौभाग्यवतींसह हजेरी लावली...

नऊशे जावयांना धोंडे जेवण
न्हावरे : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे अधिक मासानिमित्त माजी आमदार अशोक पवार व
पंचायत समिती सदस्या सुजाता
पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या वतीने आयोजित
करण्यात आलेल्या सामुदायिक धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाला नऊशे जावई-पाहुण्यांनी आपल्या सौभाग्यवतींसह हजेरी लावली.
वडगाव रासाई येथील रासाईदेवी मंदिराच्या समोरील भव्य पटांगणात हा कार्यक्रम धार्मिक व मंगलमय वातावरणात पार पडला. सकाळपासूनच मंगलवाद्याच्या निनादात रांगोळ्या सजवून
पायघड्या टाकून मोठ्या आदराने जावई-पाहुणे व लेकींचे स्वागत ग्रामस्थ करत होते. माजी आमदार अशोक पवार व पंचायत समिती सदस्या सुजाता पवारजावई
पाहुण्यांचे व या कार्यक्रमाच्या निमित्ताने माहेराच्या ओढीने आलेल्या गावातील लेकींचे स्वागत करताना आपुलकीने आणि जिव्हाळ्याने विचारपूस करत होते. जीवाभावाचे व ऋणानुबंधाचे घट्ट नाते निर्माण करणाऱ्या या प्रसंगी काहीसे भावूक वातावरण निर्माण झाले होते.
गावातील ग्रामस्थांमध्ये एकमेकांविषयीचे प्रेम व आपुलकी वाढीस लागते. त्यामुळे माजी आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, अशाच स्वरूपाचे गावोगावी सामुदायिक धोंडे जेवणाचे कार्यक्रम झाले तर ग्रामस्थांमध्ये परस्परांबद्दल प्रेम व आपुलकीची भावना वाढीस लागेल.(वार्ताहर)